Next
एक जानेवारीपासून जुने एटीएम कार्ड वापरातून बंद होणार
ईएमव्ही आधारित नवे कार्ड बदलून घेण्याचे ‘महाबँके’चे ग्राहकांना आवाहन
प्रेस रिलीज
Thursday, December 20, 2018 | 01:52 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) जारी केलेल्या परिपत्रकानुसार जुनी मॅगस्ट्रीप आधारित एटीएम कार्ड ३१ डिसेंबर २०१८पासून बंद होणार असल्याने ग्राहकांना नवे ईएमव्ही चिप आधारित एटीएम कम डेबिट कार्ड बदलून द्यावेत, अशा सूचना ‘आरबीआय’ने बँकाना केल्या आहेत. त्यानुसार कार्डाच्या दर्शनी भागाच्या डाव्या बाजूस चिप बसवल्या गेलेल्या नव्या ईएमव्ही चिप आधारित एटीएम कम डेबिट कार्ड ग्राहकांनी नि:शुल्क बदलून घ्यावे, असे आवाहन बँक ऑफ महाराष्ट्रतर्फे करण्यात आले आहे.

जुने मॅगस्ट्रीप आधारित एटीएम कम डेबिट कार्ड बँकेत जमा करून त्या बदल्यात ईएमव्ही चिप आधारित एटीएम कम डेबिट कार्ड घेण्याचे आवाहन महाबँकेडून वेळोवेळी केले गेले आहे. हे नवे कार्ड ग्राहकांना नि:शुल्क बदलून दिले जाईल. ३१ डिसेंबर २०१८ नंतर सर्व जुनी मॅगस्ट्रीप आधारित एटीएम कम डेबिट कार्ड निष्क्रिय केली जाणार असल्याने त्याचा वापर ग्राहकांना करता येणार नाही. नवे चिप आधारित कार्ड घेण्यासाठी ग्राहक बँक ऑफ महाराष्ट्रच्या कोणत्याही सोईच्या शाखेत जाऊन नवे कार्ड प्राप्त करू शकतात त्यामुळे ग्राहकांना त्यांचे खाते असणार्‍या शाखेतच जाण्याची आवश्यकता नाही.

नवे ईएमव्ही चिप आधारित एटीएम कम डेबिट कार्ड जुन्या मॅगस्ट्रीप आधारित एटीएम कम डेबिट कार्डाच्या बदल्यात घेण्याचे आवाहन बँकेने एसएमएसद्वारे तसेच एटीएममध्ये पोस्टर्सच्या प्रदर्शनाने आणि एटीएम स्क्रिन्सवरील संदेशाद्वारे केले आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search