Next
‘डीकेटीई’मध्ये १० मार्चला पहिला पदवीप्रदान समारंभ
प्रेस रिलीज
Wednesday, March 06, 2019 | 05:28 PM
15 0 0
Share this storyइचलकरंजी : येथील ‘डीकेटीई’च्या टेक्स्टाइल व इंजिनीअरिंग इन्स्टिट्यूटमध्ये पहिला पदवी प्रदान सोहळा १० मार्च २०१९ रोजी दुपारी ३.३० वाजता आयोजित करण्यात आला आहे. या प्रसंगी ‘एआयसीटीई’चे अध्यक्ष डॉ. अनिल सहस्रबुद्धे, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, ‘डीकेटीई’चे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, उपाध्यक्ष आणि माजी मंत्री प्रकाश आवाडे उपस्थित राहणार आहेत.

कल्लाप्पाणा आवाडे यांच्या अध्यक्षतेखाली १९८२ साली महाराष्ट्रातील विनाअनुदानित तत्वावर सुरू झालेली ‘डीकेटीई’ ही संस्था आज इंजिनीअरिंगच्या विविध शाखांमध्ये शिक्षण देणारी एक यशस्वी संस्था म्हणून परिचित आहे. २०१६साली आपल्या वैशिष्ट्यपूर्ण शैक्षणिक प्रगतीमुळे ‘डीकेटीई’ला नवी दिल्लीच्या युनिर्व्हसिटी ग्रॅन्टस कमिशन (युजीसी) व कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाकडून ‘अ‍ॅटोनॉमस स्टेटस’ दर्जा प्राप्त झाला आहे. त्यानंतर शैक्षणिक वर्ष २०१७-१८ ला पदव्युत्तर, पदवी मिळालेल्या विद्यार्थ्यांची पहिली बॅच बाहेर पडली आहे.

‘डीकेटीई’मध्ये एमटेक टेक्सटाइल टेक्नॉलॉजी, एमटेक टेक्निकल टेक्स्टाइल, एमटेक टेक्स्टाइल केमिस्ट्री, एमटेक इलेक्ट्रॉनिक्स, एमटेक मेकॅनिकल, एमटेक कॉम्प्युटर सायन्स, एमबीए व एमबीए टेक्स्टाइल असे एकूण आठ पदव्युत्तर अभ्यासक्रम आहेत. त्यामध्ये ११० विद्यार्थ्यांनी २०१७-१८ पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. या सर्व पदवी प्राप्त विद्यार्थ्यांना या समारंभात पदवी बहाल करण्यात येणार आहे. या वेळी विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळवलेली पद्मश्री बर्गे हिला सुवर्णपदक देऊन सन्मानित केले जाणार आहे.

‘‘डीकेटीई’मध्ये एकूण ११ पदवी अभ्यासक्रम कार्यरत आहेत. आजपर्यंत शिवाजी विद्यापीठाच्या पदवीप्रदान समारंभामध्ये बीटेक पदवी प्राप्त विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येत असे; पण ज्या संस्थेमध्ये विद्यार्थ्यांचे पदवी शिक्षण होते त्याच महाविद्यालयाशी त्याचे दृढ नाते असते. त्यामुळे त्या इन्स्टिट्यूटमध्ये येऊन पदवी प्राप्त करण्याचा वेगळा आनंद त्या विद्यार्थ्यांना मिळत असतो. या बाबी लक्षात घेऊन दिल्लीच्या विद्यापीठ अनुदान आयोगाने व शिवाजी विद्यापीठाने ‘डीकेटीई’सारख्या स्वायत्त संस्थाना २०१८-१९ वर्षापासून महाविद्यालयामध्येच पदवी प्रदान सोहळा आयोजित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार ‘डीकेटीई’तून शैक्षणिक वर्ष २०१७-१८ साली बीटेक- बीई पदवी प्राप्त केलेल्या सर्व विद्यार्थ्यांनाही पदवी बहाल केली जाणार आहे. प्रथम क्रमांक प्राप्त बीटेक विद्यार्थ्यांना मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे,’ अशी माहिती संस्थेचे डायरेक्टर डॉ पी. व्ही. कडोले यांनी दिली.

डॉ. कडोले म्हणाले, ‘‘डीकेटीई’चे विद्यार्थी जगभरात संस्थेचे नाव विविध संस्थांमधून उज्ज्वल करताना दिसतात. पदवीप्राप्त या सर्व विद्यार्थ्यांचा सन्मान व्हावा व आपल्या मातृसंस्थाबद्दल आत्मियता वाढावी या उद्दशाने ‘डीकेटीई’च्या इतिहासातील पहिल्या पदवी प्रदान सोहळयाचे आयोजन केले आहे.’   

या सोहळ्यास ‘डीकेटीई’चे सर्व विश्‍वस्त, बोर्ड ऑफ गव्हर्नस्, अ‍ॅकॅडमिक कौन्सिल सदस्य, अभ्यासक्रम मंडळाचे सदस्य, विद्यापरिषदेचे सदस्य, शिवाजी विद्यापीठ प्रतिनिधी, विविध महाविद्यालयांचे प्राचार्य व त्यांचे प्रतिनिधी यांच्यासह ‘डीकेटीई’चे डे.डायरेक्टर डॉ. यू. जे. पाटील, डॉ. एल. एस. आडमुठे, परीक्षा नियंत्रक डॉ. आर. ए. पाटील, सर्व डीन्स, सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link