Next
‘तुला पाहते रे’नंतर गायत्री दातार लवकरच रंगभूमीवर
ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात ‘निम्मा शिम्मा राक्षस’ नाटकाचा शुभारंभ
BOI
Tuesday, July 23, 2019 | 06:01 PM
15 0 0
Share this article:


मुंबई : ‘तुला पाहते रे’ या छोट्या पडद्यावरील मालिकेने नुकताच सर्वांचा निरोप घेतला. या मालिकेतून सर्वांची लाडकी बनलेली ‘ईशा’ अर्थात गायत्री दातार लवकरच रंगभूमीवर पदार्पण करत आहे. ‘निम्मा शिम्मा राक्षस’ या नाटकातून ती दिसणार असून ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात या नाटकाचा शुभारंभ होणार आहे. 

‘तुला पाहते रे’ या मालिकेतील विक्रांत सरंजामे आणि ईशा या जोडीवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केले. अतिशय कमी वेळात ही मालिका लोकप्रिय झाली. या मालिकेतून दिसलेला नवीन चेहरा गायत्री दातार हिने या मालिकेच्या माध्यमातून अभिनय क्षेत्रात पाऊल टाकले आणि पाहता पाहता ती सूपरहिट ठरली. नुकताच या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला, पण असे असले, तरी गायत्री आता एका नव्या मंचावरून पुन्हा प्रेक्षकांना भेटणार आहे. 

राहूल भंडारे निर्मित ‘निम्मा शिम्मा राक्षस’ हे एक बालनाट्य असून यामध्ये गायत्री प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. अद्वैत थिएटर्सच्या या नाटकाच्या निमित्ताने ज्येष्ठ नाटककार रत्नाकर मतकरी, चिन्मय मांडलेकर आणि राहूल भंडारे एकत्र आले आहेत. रत्नाकर मतकरी यांनी हे नाटक लिहिले असून चिन्मय मांडलेकर यांनी दिग्दर्शन केले आहे. 

रत्नाकर मतकरीनाटकात गायत्री दातारसोबत अंकुर वाढवे आणि मयुरेश पेम हे कलाकार दिसणार आहेत. दरम्यान या नाटकाची एक विशेष बाब म्हणजे प्रेक्षकांना या नाटकात, नाट्य अवकाशाचे थ्री डी स्वरुप अनुभवता येणार आहे. विविध दृश्यांमध्ये प्रोजेक्शनच्या पातळीवर थ्री डी मॅपिंग हे तंत्र रंगमंचावर वापरण्यात येणार आहे. यामुळे नाटकाच्या दृश्यांमधून दिसणारे अवकाश प्रेक्षकांना वास्तव भासणार आहे. 

नाटकात तीन गाणी असून चिन्मय मांडलेकर यांनी ती लिहिली आहेत. मयुरेश माडगांवकर यांनी ही गाणी संगीतबद्ध केली असून गायक जसराज जोशी यांनी ती गायली आहेत. या नाटकात गायत्री दातार शहजादीच्या भूमिकेत दिसणार आहे. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search