Next
शिशिर जोशीपुरा ‘प्राज इंडस्ट्रीज’चे नवे सीईओ
प्रेस रिलीज
Thursday, April 12, 2018 | 12:34 PM
15 0 0
Share this story

शिशिर जोशीपुरा
पुणे : ‘प्राज इंडस्ट्रीज्’ या जागतिक प्रक्रिया सोल्युशन्स कंपनीने शिशिर जोशीपुरा यांची मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आणि व्यवस्थापकीय संचालक (एमडी) पदी नियुक्ती केली आहे. दोन एप्रिलपासून त्यांनी कार्यभार स्वीकारला आहे.  

जोशीपुरा यांनी बिर्ला इन्स्टिट्युट ऑफ टेक्नोलॉजी (बीआयटीएस) पिलानीमधून मेकॅनिकल इंजिनीअरिंग आणि हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून अॅडव्हान्स मॅनेजमेंटची पदवी मिळवली आहे. प्राजमध्ये रुजू होण्यापूर्वी त्यांनी २००९ पासून एसकेएफ इंडिया लिमिटेडमध्ये व्यवस्थापकीय संचालक आणि राष्ट्रीय व्यवस्थापक म्हणून काम पाहिले आहे.

या नियुक्तीबद्दल बोलताना प्राज इंडस्ट्रीजचे कार्यकारी अध्यक्ष  प्रमोद चौधरी म्हणाले, ‘प्राजचे नवे सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक शिशिर यांचे मी मंडळातर्फे स्वागत करतो. विविध स्तरावर नेतृत्व करीत त्यांच्या ३५ वर्षांहून अधिक अनुभवासह ते आमच्या कंपनीत रुजू होत आहेत. उद्योग क्षेत्रातील विविध कल्पनांच्या पार्श्वभूमीसह स्थानिक आणि जागतिक बाजारपेठेतील त्यांचा अभ्यास वृद्धीच्या पुढील टप्प्यात प्राजसाठी निश्चितच मार्गदर्शक ठरेल. नुतनीकरणक्षम इंधनाची मागणी घातांकी दराने वाढत आहे आणि इथेनॉल हे त्याच्या स्वच्छ आणि शाश्वत गुणधर्मांमुळे पहिली पसंती म्हणून उदयास येण्याची आम्ही अपेक्षा करतो.’

‘जगभरातील व्यवसायाचे ऊर्जा, आर्थिक आणि पर्यावरणाद्वारे शाश्वततेवर प्रबल लक्ष्य केंद्रीत करण्यात आले आहे’, असे श्री. जोशीपुरा म्हणाले. ‘जागतिक नुतनीकरणक्षम ऊर्जा उद्योगाला गती मिळत आहे, जैव-ऊर्जेतील अंतर अभूतपूर्व संधी निर्माण करीत आहे. प्राज ही जैव ऊर्जा सोल्युशन्समधील (संयोगातील) जगभरातील एक प्रमुख सहभागी आहे, उलगडत जाणाऱ्या संधी पुढील टप्प्यात प्राजच्या वाढीसाठी कॅन्व्हास ठरत आहेत आणि मी या रोमहर्षक प्रवासात पुढाकार घेण्यास उत्सुक आहे.’

प्राज कंपनी ही पर्यावरण, ऊर्जा आणि कृषी प्रक्रियेतील अॅप्लिकेशन्समधील प्रमुख जागतिक उत्पादक आहे. ही कंपनी आधुनिक इथेनॉल तंत्रज्ञानातील आघाडीची विजेती आहे. प्राजचा स्वतःचा आणि भारतातील पहिला एकात्मिक आधुनिक प्रायोगिक जैव रिफायनरी डिसेंबर २०१६ पासून कार्यान्वित आहे. भारतीय तेल विपणन कंपन्या भारतात अनेक आधुनिक जैव रिफायनरीजची उभारणी करीत असताना विविध प्रकल्पांसाठी प्राजची तंत्रज्ञान भागिदार म्हणून निवड झाली आहे. तसेच, विविध देशांतील प्राजच्या जैव रिफायनरी प्रकल्पांबाबत भारताबाहेरील अनेक ग्राहक चर्चा करीत आहेत.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link