Next
शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी महाधनतर्फे नवीन खते
प्रेस रिलीज
Thursday, June 28, 2018 | 05:41 PM
15 0 0
Share this story

पुणे : ‘‘स्मार्टकेम टेक्नोलॉजीज लिमिटेड’ने (एसटीएल) शेती उत्पादनात लक्षणीय वाढ घडवून आणणारी नाविन्यपूर्ण सेंद्रीय आवरणयुक्त खते बाजारपेठेत आणली आहेत. ‘स्मार्टटेक’ या ब्रँडअंतर्गत १०:२६:२६: आणि १२:३२:१६ या खतांची नाविन्यपूर्ण श्रेणी सादर करण्यात आली आहे’, अशी माहिती कंपनीच्या पीक पोषण व्यवसायाचे कार्यकारी उपाध्यक्ष अरविंद कुलकर्णी यांनी दिली. 

याबाबत अधिक माहिती देताना ते म्हणाले, ‘दीपक फर्टीलायझर्स’ गेल्या तीन दशकांपासून ‘महाधन’ या ब्रँडअंतर्गत शेतकऱ्यांना दर्जेदार खते पुरवत आहे. शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी यासाठी उपयुक्त ठरतील अशी नवीन खते देण्याच्या उद्देशाने आता ‘स्मार्टकेम टेक्नोलॉजीज लिमिटेड’ या उपकंपनीद्वारे ‘स्मार्टटेक’ नावाने ही उत्पादने आणण्यात आली आहेत. यामध्ये परदेशातून आयात केलेल्या कार्बन आणि खनिज घटक युक्त सेंद्रीय घटकांचे आवरण दर्जेदार रासायनिक खतांवर दिले आहे. ही खते पिकाच्या वाढीसाठी अत्यावश्यक असलेल्या पोषणद्रव्यांचा सुधारीत पुरवठा करण्यास उपयुक्त ठरतात. या खतांचा वापर केल्यास जमिनीची उत्पादकता वाढत असल्याचे तसेच, पिकातील पोषणमूल्ये सुधारत असल्याचे सिद्ध झाले आहे. उत्पादनात १५ ते २० टक्के वाढ होत असून, त्या तुलनेत खताचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांना खर्च आणि उत्पन्नाचे गुणोत्तर प्रमाण सुधारण्यासाठी हे सहाय्यभूत ठरते.’

कुलकर्णी पुढे म्हणाले, ‘खतांच्या क्षेत्रात गेल्या अनेक वर्षात फार कमी संशोधन झालेले आहे. शेतीतील उत्पन्न वाढविण्यासाठी नाविन्यपूर्ण खतांची गरज आहे. महाराष्ट्रात आजही मोठ्या प्रमाणात अन्य राज्यांमधून खते आयात केली जातात. त्यामुळे या बाजारपेठेत मोठी संधी आहे, हे लक्षात घेऊन कंपनीने खत उद्योगावर लक्ष केंद्रित केले आहे. त्यासाठी स्मार्टकेम टेक्नोलॉजीज लिमिटेड’ने (एसटीएल) ही वेगळी कंपनी स्थापन केली आहे. त्या अंतर्गत कंपनीने तीन वर्षे संशोधन करून, ही नवीन क्रांतीकारी खते ‘स्मार्टटेक’ नावाने दाखल केली आहेत. विविध कृषी महाविद्यालयांमध्ये, कापूस, सोयाबीन, गहू, ज्वारी, ऊस अशा विविध पिकांसाठी त्याच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत.’ 

‘गेल्या वर्षी जानेवारीमध्ये ही खते बाजारपेठेत आणण्यात आली. साडेपाच हजार शेतकऱ्यांना त्याचा मोफत पुरवठा करण्यात आला. गेल्या वर्षी साडे पंधरा हजार टन खताचा खप झाला. आता येत्या खरीप हंगामात या खतांची मागणी वाढेल, असा विश्वास आहे’, असे नरेश देशमुख यांनी सांगितले. 

‘कंपनीने तळोजा येथील प्रकल्पात ७५० कोटींची गुंतवणूक करून प्रकल्पाची उत्पादन क्षमता वाढवली आहे. सध्या १.५ लाख टन स्मार्टकेम खताची निर्मिती केली जात आहे. त्याला मिळणारा प्रतिसाद बघून नंतर उत्पादन वाढवले जाईल, असे कुलकर्णी यांनी सांगितले. 

‘शेतकऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी कंपनीने ‘महाधन’नावाने अॅप दाखल केले असून, समाजमाध्यमाद्वारे शेतकऱ्यांशी संपर्क साधून, त्यांना आवश्यक ती माहिती दिली जात आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळत असून, फेसबुक पेजला दीड लाख लोकांनी भेट दिली आहे’, असे प्रणव ठक्कर यांनी सांगितले. 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link