Next
नव्या गायकांच्या गाण्यांचा ‘पेहली गूंज’ आल्बम सादर
प्रेस रिलीज
Thursday, December 13, 2018 | 05:09 PM
15 0 0
Share this article:पुणे : बांधकाम क्षेत्रातील अग्रेसर ‘पुष्पगंगा व्हेंच्युअर्स’ने संगीत जगतात पदार्पण केले असू,न ‘पेहली गूंज’ हा आपला पहिला हिंदी गाण्यांचा आल्बम सादर केला आहे. या आल्बममधून अक्षता संब्याल (वय १५), प्रशांत सिंग कलहंस (१७) आणि जसु खान मीर ( १४) या नव्या प्रतिभासंपन्न तरुण गायकांना प्रसिद्धी देण्यात आली आहे. त्यातील दोन गायक ‘व्हॉइस इंडिया किड्स’ आणि ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ या लोकप्रिय संगीत कार्यक्रमातून पुढे आले आहेत.

या संदर्भात ‘पुष्पगंगा व्हेंच्युअर्स’चे व्यवस्थापकीय संचालक अम्मुल गोयल म्हणाले, ‘आम्ही अतिशय प्रज्ञावान अशा तीन तरुण गायकांना सादर करत आहोत. त्यांची गाणी या आल्बमद्वारे सादर करून आम्ही त्यांच्यासाठी एक व्यासपीठ निर्माण करण्याचे ठरवले आहे. यापुढची पायरी म्हणजे या गायकांच्या संगीत मैफलींचे देशभरातील सर्व प्रमुख शहरांत, तसेच परदेशांतही आयोजन करणे. यामध्ये पुणे, मुंबई, बंगळुरू, लखनऊ, हैदराबाद, चेन्नई, दिल्ली, राजस्थान, गुजरात, गोवा, नागपूर, चंडीगड व जयपूर या प्रमुख शहरांचा समावेश असेल.’अक्षता ही बंगळुरुची रहिवासी असून, ती ‘व्हॉइस इंडिया किड्स’ची स्पर्धक आहे. तिच्या सुमधुर आवाजाने तिने याआधीच ‘गुंजाइश’ या लघुपटाद्वारे चित्रपट क्षेत्रात आपला ठसा उमटविला आहे. बॉलिवूडसाठी गायचे तिचे स्वप्न आहे. प्रशांतने लोकप्रिय चित्रपटगीते दमदारपणे सादर करत आपल्यातील गायकाची चुणूक दाखवली आहे. प्रशांतलाही बॉलिवूडमध्ये पार्श्वगायन करण्याची इच्छा आहे. राजस्थानातील जसु खान मीर या बासरीप्रेमीने वयाच्या पाचव्या वर्षी संगीत शिकण्यास सुरवात केली असून, त्याने  ‘व्हॉइस इंडिया किड्स’ व ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ या दोन्ही स्पर्धांत लोकप्रियता मिळवली आहे.

‘पेहली गूंज’ या आल्बममध्ये मैत्री, प्रेम, इमानदारी व देशभक्ती अशा विविध भावभावनांचा आविष्कार घडवणारी गाणी आहेत. ‘बाजीराव मस्तानी’, ‘मेरी कोम’, ‘रेस २’ व अशा अनेक चित्रपटांचा प्रसिद्ध गीतकार प्रशांत इंगोले यांनी यासाठी गीतलेखन केले आहे. आल्बममधील पाच गाण्यांपैकी दोन गाण्यांचा व्हिडिओ नुकताच सादर करण्यात आला. यातील ‘कुछ भी नही’ या गाण्याला श्रेयस पुराणिक याने संगीत दिले असून, ‘यारा तेरी यारी’ या गाण्याला विक्रम माँट्रोज याने संगीत दिले आहे.

या आल्बमचा व्हिडिओ तयार करण्यासाठी ‘पुष्पगंगा’ प्रयत्नशील असून, तो लवकरच सर्व रेडिओ, टीव्ही व ऑनलाईन मीडियावर सादर केला जाईल.

‘स्वॅगलिव्ह’ ॲपचे सादरीकरण

‘भारतात गुणवत्ता असलेले खुपजण आहेत पण योग्य माहितीअभावी ते मागे राहतात. यासाठीच आम्ही ‘स्वॅगलिव्ह’ हे ॲप सादर करत असून, हे ॲप म्हणजे ऑनलाइन व्हिडिओ शेअरिंग प्लॅटफॉर्म आहे. येथे भारतातील प्रत्येकजण आपले बुद्धिकौशल्य प्रदर्शित करू शकणार असून, हे कौशल्य केवळ संगीतापुरते मर्यादित नसेल, तर नकला, विनोद, नृत्य, आरजे, एमजे, व्हीजे अशा क्षेत्रांतील व सर्व वयोगटांचा यात समावेश असेल. यातून या कलाकारांना आघाडीच्या रिअलिटी शोंचा भाग बनण्याचीही संधी मिळेल व त्यांची ज्यासाठी खरोखर पात्रता आहे ते नाव व प्रसिदधीही मिळवू शकतील. या ॲपचे सादरीकरण पुढील महिन्यात केले जाणार असून, हे संपूर्णपणे भारतात विकसित झालेले सोशल व्हिडिओ, ऑडिओ, चॅटिंगचे व्यासपीठ आहे.’

(Please click here to read this news in English.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search