Next
गांधी ग्लोबल सौर यात्रा : कोल्हापुरात २५० जणांना सौरदिवे बनविण्याचे प्रशिक्षण
BOI
Saturday, October 05, 2019 | 05:30 PM
15 0 0
Share this article:कोल्हापूर :
‘स्वच्छ ऊर्जा आणि ऊर्जेच्या संदर्भात स्वयंपूर्णता हा जगातील प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे. त्यासाठी युवकांनी अपारंपरिक ऊर्जेचा वापर करून गांधी जयंतीच्या निमित्ताने पर्यावरणाप्रति अहिंसा व प्रेम प्रदर्शित करण्याची गरज आहे,’ असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी दोन ऑक्टोबर रोजी कोल्हापुरात केले.

शिवाजी विद्यापीठाच्या तंत्रज्ञान अधिविभागात महात्मा गांधी यांच्या १५०व्या जयंतीच्या निमित्ताने ‘आयआयटी, मुंबई’च्या सहकार्याने ‘गांधी ग्लोबल सौर यात्रा’ या उपक्रमांतर्गत विद्यार्थी सौरदूत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या कार्यशाळेत २५० सौरदूतांना ‘सोलर स्टडी लँप’ बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले.

कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे

कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, ‘ग्लोबल वॉर्मिंगसदृश हवामानबदलाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणाप्रति सजगता आणि स्वच्छ ऊर्जेचा पुरस्कार करण्याची आज नितांत गरज आहे. त्यासाठी जगभरातील विद्यार्थ्यांमध्ये जागृती करण्यासाठी ‘आयआयटी, मुंबई’ने गांधी जयंतीच्या निमित्ताने केवळ देशातच नव्हे, तर जगभरातील ८० देशांतील सुमारे चार हजार केंद्रांमध्ये ग्लोबल सौर यात्रेचे आयोजन केले. त्यामध्ये विद्यापीठाच्या तंत्रज्ञान अधिविभागाचा समावेश करण्यात आला, ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घेऊन सौर ऊर्जेचा वापर जनसामान्यांचे जीवन सुखकर करण्यासाठी कसा करता येईल, या दृष्टीने या कार्यशाळेचा लाभ घ्यावा. तसेच, भावी जीवनातही अपारंपरिक ऊर्जेच्या क्षेत्रात संशोधनासाठी सिद्ध व्हावे.’ तंत्रज्ञान अधिविभागाचे संचालक डॉ. जे.एस. बागी म्हणाले, ‘गांधी ग्लोबल सौर यात्रेतून जगभरात सौरऊर्जेबाबत जागृती, तसेच अपारंपरिक ऊर्जा वापरण्यासाठी प्रोत्साहन देण्याचा उद्देश आहे. याद्वारे अत्यल्प खर्चात, विश्वासार्ह आणि टिकाऊ सौर उपकरणांची निर्मिती शक्य आहे. अशा उपक्रमांतून युवकांना रोजगार निर्मितीसाठी सक्षम बनविण्याबरोबरच स्थानिकांना या ऊर्जेचे लाभ देणेही शक्य होणार आहे.’

या उद्घाटन समारंभाला प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, वित्त व लेखाधिकारी व्ही. टी. पाटील, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक गजानन पळसे उपस्थित होते. तंत्रज्ञान अधिविभागातील प्रवीण प्रभू यांनी कार्यशाळेचे समन्वयक व मार्गदर्शक म्हणून काम पाहिले.२५० सौरदूतांनी बनविले सोलर स्टडी लँप
तंत्रज्ञान अधिविभागात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यशाळेत ‘बीटेक’च्या सुमारे २५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या विद्यार्थ्यांना सोलर स्टडी लँप बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. टेक्विप उपक्रमांतर्गत त्यांना त्यासाठी आवश्यक साधनांची उपलब्धता करून देण्यात आली. सौर ऊर्जेच्या प्रसारासाठी काम करण्याची आणि पर्यावरणाप्रति अहिंसा धर्म बाळगण्याची शपथ त्यांना या वेळी देण्यात आली.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search