Next
शिवाजी कुल संस्थेचा शताब्दी वर्ष समारोप महोत्सव सोमवारपासून
शतप्रवाह स्मरणिका प्रकाशन व बाल – कार्य सन्मान सोहळ्याचे आयोजन
BOI
Friday, January 04, 2019 | 04:47 PM
15 0 0
Share this article:

पुणे : ‘मुलांनी मुलांसाठी चालवलेली चळवळ’, असे ब्रीद अंगिकारून कार्यरत असलेल्या भारतातील सर्वांत जुन्या स्काऊट  गाईड खुल्या पथकांपैकी एक असलेल्या सदाशिव पेठेतील श्री शिवाजी कुल, पुणे या स्काऊट गाईड खुल्या पथकाने १०० वर्ष पूर्ण केली आहेत. संस्थेच्या शताब्दी वर्षाचा समारोप महोत्सव सात ते नऊ जानेवारीदरम्यान टिळक स्मारक मंदिर सभागृहात होणार आहे. 

सात, आठ आणि नऊ जानेवारी असे तीन दिवस दररोज सायंकाळी पाच ते सात या वेळेत हा महोत्सव होणार आहे. या तीन दिवसीय महोत्सवात शतप्रवाह स्मरणिका प्रकाशन, बाल – कार्य सन्मान यांसह सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती संस्थेच्या शताब्दी समितीचे माधव धायगुडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या वेळी योगिनी जोगळेकर, संस्थेच्या कुलमुख्य श्रेया मराठे, शिवाजी रोडे, निखिल चिंचकर आदी उपस्थित होते. सोमवारी (सात जानेवारी) सायंकाळी पाच वाजता महोत्सवाचे उद्घाटन व शतप्रवाह स्मरणिका प्रकाशन होणार आहे. या वेळी ज्येष्ठ समाजसेविका मीरा बडवे, चिंटूकार चारुहास पंडित उपस्थित राहणार आहेत. मंगळवारी (आठ जानेवारी) सायंकाळी पाच ते सात या वेळेत कुलवीरांचे विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम होणार आहेत. त्यानंतर सायंकाळी सात ते रात्री आठ या वेळेत जादुगार संजय रघुवीर यांचे जादूचे प्रयोग होणार आहेत, तर बुधवारी (नऊ जानेवारी) रोजी सायंकाळी पाच ते सहा या वेळेत कुलवीरांचे विविध गुणदर्शन कार्यक्रम होणार आहेत. त्यानंतर सायंकाळी सहा वाजता शताब्दी वर्षाचा मुख्य समारोप सोहळा होणार आहे.

मुख्य समारोप सोहळ्यात, पुण्यात अनेक वर्षं लहान मुलांसाठी काम करणाऱ्या महाराष्ट्रीय मंडळाला संस्थेतर्फे पहिला ‘बाल – कार्य सन्मान’ प्रदान करण्यात येणार आहे. शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह असे या सन्मानाचे स्वरूप आहे. या वेळी लेफ्टनंट जनरल विनायक पाटणकर, कै. लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते शिरीष मोहिते उपस्थित राहणार आहेत. 

या तीन दिवसीय महोत्सवाला विनामूल्य प्रवेश असून पुणेकरांनी व आजी – माजी कुलवीरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search