Next
‘पर्यावरण रत्न’साठी अर्ज पाठवण्याचे आवाहन
प्रेस रिलीज
Monday, May 14 | 02:27 PM
15 0 0
Share this story

पुणे : पर्यावरण विभागाच्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीतर्फे दरवर्षीप्रमाणे यावर्षी ही स्वर्गीय भारतरत्न राजीव गांधी यांच्या स्मरणार्थ राजीव गांधी पर्यावरण रत्न व राजीव गांधी पर्यावरण भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. हा कार्यक्रम पाच जून रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त देशपातळीवर आणि राज्य स्तरावर होणार आहे.
    
पर्यावरण जनजागृती क्षेत्रामध्ये ज्यांचे मोठे योगदान आहे, ज्या व्यक्ती व संस्था (शासकीय, निमशासकीय आणि एनजीओ) काम करीत आहेत यांना या कार्यक्रमात गौरविण्यात येईल. संस्थांनी व व्यक्तींनी केलेल्या कामाचा अहवाल त्यासोबत छायाचित्रे, वृत्तपत्रात छापून आलेले लेख अथवा बातम्या या संदर्भात संस्थांनी केलेल्या गौरव सर्व माहिती २० मे २०१८पर्यंत पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अर्ज पाठवण्याचा पत्ता : अशोकराव मोरे, अध्यक्ष पर्यावरण विभाग, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, टिळक भवन, काकासाहेब गाडगीळ मार्ग दादर (प.) मुंबई ४०० ०२५.
फोन : ०२२- २४३० १३६९, २४३० १३०१
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link