Next
अवघ्या वीस रुपयांमध्ये दोन लाख रुपयांचा टर्म इन्श्युरन्स
अॅगन लाइफ व मोबिक्विक यांचे उत्पादन
प्रेस रिलीज
Wednesday, April 24, 2019 | 12:30 PM
15 0 0
Share this article:

नवी दिल्ली : देशातील डिजिटल इन्श्युरन्सची प्रवर्तक अॅगन लाइफ इन्श्युरन्स आणि मोबिक्विक फिनटेक यांनी अवघ्या वीस रुपयांत दोन लाखांचा डिजिटल इन्श्युरन्स  आणि अपघात विम्याचा फायदा देणारे अॅगन लाइफ ग्रुप टर्म प्लस प्लॅन हे अनोखे उत्पादन दाखल केले आहे. हे उत्पादन प्रामुख्याने मोबिक्विक अॅपवर उपलब्ध आहे. दोन लाख रुपयांच्या विम्याच्या रकमेसाठी वीस रुपये इतका कमी प्रीमिअम भरून हा प्लॅन खरेदी करता येऊ शकतो. यामध्ये टर्म इन्श्युरन्स व अॅक्सिडेंटल डिसेबिलिटी यांचा समावेश आहे.

या नव्या स्मार्ट इन्श्युरन्स उत्पादनासाठी मोबिक्विकने आपल्या अॅपवर पूर्णतः डिजिटल इन-अॅप पर्चेस फ्लोचा समावेश केला आहे. ग्राहकांना एक लाख रुपये, दीड लाख रुपये व दोन लाख रुपये अशा तीन विम्याच्या रकमांतून एक पर्याय निवडता येईल. त्याबरोबर कोणत्याही अतिरिक्त खर्चाविना एक लाख रुपये, दीड लाख रुपये व दोन लाख रुपयांचे अतिरिक्त अॅक्सिडेंटल डिसेबिलिटी कवच मिळेल. अनुक्रमे २० रुपये, ३० रुपये व ४० रुपये प्रीमिअम देऊन योजना खरेदी करता येऊ शकते.  

या भागीदारीविषयी बोलताना, अॅगन लाइफ इन्श्युरन्सचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी विनीत अरोरा म्हणाले, ‘मोबिक्विकबरोबरच्या या सहयोगामुळे, ऑनलाइन चॅनलद्वारे प्रत्येकाला नावीन्यपूर्ण व गरजेनुसार विमा उत्पादन देण्याची अॅगन लाइफची बांधिलकी अधोरेखित होणार आहे. डिजिटल माध्यमातून विमा खरेदी करण्याचा एक महत्त्वाचा फायदा म्हणजे, प्रक्रिया झटपट होते. प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल असल्याने, ग्राहकांना सामावून घेण्याची प्रक्रिया काही मिनिटांमध्ये पूर्ण होते व विमाकवच तातडीने जारी केले जाते. या भागीदारीमुळे, टर्म इन्श्युरन्स उत्पादनांची व्याप्ती वाढेल, अशी आमची अपेक्षा आहे आणि विमाकवच न घेण्यासाठी केली जाणारी टाळाटाळ टाळली जाईल, असे वाटते.’

मोबिक्विकच्या सह-संस्थापक व चीफ ऑपरेटिंग ऑफिसर उपासना टाकू यांनी सांगितले, ‘डिजिटल इन्श्युरन्स क्षेत्रामध्ये आम्ही प्रवेश केल्यापासून, ग्राहकांपर्यंत स्मार्ट विमा उत्पादने पोहोचवण्यासाठी भागीदारीचा पर्याय निवडला आहे. भारतामध्ये आमच्या उद्दिष्टानुसार परिणाम करण्याच्या दृष्टीने व विम्याचे भारतातील सध्याचे ३.७ टक्के प्रमाण वाढवण्याच्या हेतूने ही उत्पादने तयार करण्यात आली आहेत.’  
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search