Next
आनंदीबाई अभ्यंकर बालकमंदिरात दहीहंडी
BOI
Saturday, September 01, 2018 | 04:43 PM
15 0 0
Share this article:

राधा-कृष्णाच्या वेशभूषेत स्वरा साळुंखे-अर्णव पटवर्धन

रत्नागिरी :
दी न्यू एज्युकेशन सोसायटीच्या आनंदीबाई परशुराम अभ्यंकर बालकमंदिरात एक सप्टेंबर २०१८ रोजी दहीहंडीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी बालगोपाळ पारंपरिक वेशभूषेत सजून आले होते. 




या वेळी कृष्णगीतांवर टिपरीनृत्याचे सादरीकरण करण्यात आले. बालगोविंदांच्या पथकांनी या वेळी जल्लोष केला. ‘गोविंदा-गोपाळा’ असा गजर करत बच्चेकंपनीने दहीहंडीचा आनंद लुटला. मोठ्या गटामध्ये अर्णव पटवर्धनने कृष्णाची, तर स्वरा साळुंखेने राधेची वेशभूषा केली होती.



संस्थेच्या कार्याध्यक्षा अॅड. सुमिता भावे, शाळा व्यवस्थापक राजीव गोगटे कार्यक्रमाला उपस्थित होते. मुख्याध्यापिका मीना रिसबूड, सर्व सहशिक्षिका, सर्व पालक प्रतिनिधी यांच्या प्रयत्नांतून कार्यक्रम यशस्वी झाला. 



विद्यार्थ्यांना सण-संस्कृती या गोष्टी लहान वयापासूनच समजाव्यात, या हेतूने शाळेत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. आनंदीबाई अभ्यंकर बालकमंदिरामध्ये सुमारे ३५० विद्यार्थी शिकतात. दहीहंडीप्रमाणेच गणेशोत्सव, दीपपूजन, सहल, वार्षिक स्नेहसंमेलन अशा उपक्रमांतून विद्यार्थ्यांना नावीन्यपूर्ण शिक्षण दिले जाते. या उपक्रमात पालकांचाही सक्रिय सहभाग असतो.

(बालगोपाळांच्या या दहीहंडीची झलक दर्शविणारा व्हिडिओ सोबत देत आहोत. रत्नागिरीतील कृ. चिं. आगाशे विद्यामंदिरातील दहीहंडीची बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search