Next
‘ब्रेक दी बिअर्ड’साठी ‘सनरायझर्स’ सज्ज
प्रेस रिलीज
Wednesday, May 16, 2018 | 10:56 AM
15 0 0
Share this story

हार्दिक पंड्यामुंबई : इंडियन प्रीमिअर लीगच्या (आयपीएल) या सीझनमध्ये मैदानात आणि मैदानाबाहेरही सतत गेममध्ये बदल होत आहेत. अशातच क्रिकेटपटू ‘#BreakTheBeard’ला एका नवीन पातळीवर नेण्यासाठी तयार झाले आहेत. या सीझनमध्ये मैदानावर खूप अटीतटीची स्पर्धा दिसत असून, भारतीय क्रिकेटपटू आपल्या दाढीची स्टाइल बदलून मैदानाबाहेरही अगदी छान सफाई (दाढी) करत आहेत. देशभरात ट्रेंडसेटर म्हणून ख्यातनाम असलेल्या या ‘#BreakTheBeard’ बॉइजकडून खास त्यांच्या चाहत्यांसाठी देखण्या, उत्तमरित्या स्टाइल केलेल्या दाढीद्वारे ग्रुमिंग केले जात आहे.

शिखर धवनहाच ट्रेंड पुढे नेत शिखर धवन यांनी आपल्या एका चाहत्याला भेटायला जाताना गब्बर लुक ठेवला. त्यांचा हा नवीन लुक देशभरातील त्यांच्या चाहत्यांच्या पसंतीला पडला. धवनकडून प्रेरणा घेऊन रवींद्र जडेजा, ऋषभ पंत, मनिष पांडे, केन विल्यमसन, हार्दिक पंड्या आणि कृणाल पंड्या यांनीही अत्यंत आगळ्यावेगळ्या दाढीच्या स्टाइल दाखवून फॅशन स्टेटमेंट केली आहेत.

धवन यांनी आपल्या चाहत्यांकडून प्रेरणा घेऊन आपला नवीन लुक त्यांना अर्पण केला. ते म्हणाले की, ‘हा ‘आयपीएल’चा नवीन सीझन आहे आणि या नवीन लुकमुळे या खेळाबाबत एक ताजा दृष्टिकोन आणि विचारसरणी दिसते. माझी ‘#BreakTheBeard’ही मला फॉलो करणाऱ्या सर्व चाहत्यांना अर्पण केलेली असून, माझ्या नवीन लुकसाठी मिळालेले प्रेम आणि कौतुक पाहून मला खूप आनंद झाला आहे.’

त्यानंतर ‘#BreakTheBeard’चा मूळ प्रेरणास्त्रोत आणि स्टाइल आयकॉन असलेल्या रवींद्र जाडेजा यानेही आपला लुक बदलायचे ठरवले. तो म्हणाला की, ‘मी कायमच माझ्या दाढीच्या स्टाइलबाबत प्रयोग करून तिला देखणी आणि नीटनेटकी ठेवली आहे आणि माझ्या चाहत्यांनाही या स्टाइल्स खूप आवडल्या आहेत. ‘सीएसके’मध्ये परत आल्यावर मला माझ्या निष्ठावान चाहत्यांसाठी काहीतरी नवीन करायचे आहे आणि हा लुक खास त्यांच्यासाठी आहे. चेहऱ्यावरील पसरलेल्या दाढीपासून स्वतःची मुक्तता करून घ्या आणि तुमची दाढी सुंदर करून तिला नीटनेटकी ठेवा.’

केन विल्यमसनन्यूझीलंडचा खेळाडू आणि ‘सनराइझर्स हैदराबाद’चा कप्तान असलेल्या केन विल्यमसननेही आपला लुक बदलला आणि आपल्या टीम सदस्य धवनपासून प्रेरणा घेतली तेव्हा ‘#BreakTheBeard’ खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचली. केनने आपली किवी दाढी एक सुंदर लुकसाठी स्टाइल केली आणि बिअर्डच्या खेळाला आंतरराष्ट्रीय पातळीवर नेले. शिखरच्या पंजाबी स्टाइलच्या प्रेमात असलेला केन म्हणाला, ‘भारतीय क्रिकेटपटू आणि विशेषतः शिखर ‘#BreakTheBeard‘मध्ये सहभागी होत असताना, त्याच्यामुळे माझ्या दाढीला स्टाइल करण्याची आणि एक चांगला ग्रूम केलेला लुक मिळवण्याची प्रेरणा मला मिळाली. भारतात उन्हाळा असल्यामुळे मैदानात खेळणे कठीण होते आणि त्यामुळे उन्हाळ्याचा सामना कऱण्याची ही माझी पद्धत आहे. हा ट्रेंड आता भारतातून न्यूझीलंडपर्यंत आंतरराष्ट्रीय स्तरावर गेला असून, तेथील लोक माझ्या या लुकचे खूप कौतुक करत आहेत.’

भारताचा सर्वाधिक स्टायलिश ऑलराऊंडर असलेल्या हार्दिक पंड्यासाठी ‘#BreakTheBeard’ हा मैदानावर जाण्यापूर्वीचा नेहमीच्या सवयीचा भाग आहे. ‘खूप लोक ‘आयपीएल’चे सामने पाहतात. त्यामुळे पडद्यावर चांगले दिसणे आणि त्यासाठी चांगले ग्रुमिंग करणे अत्यावश्यक आहे. त्याचमुळे मी सगळीकडे जिलेट प्रोग्लाइडस्टायलर आणि माक थ्री रेझर घेऊन जातो जेणेकरून मला कायमच चांगला लुक ठेवता येईल,’ असे त्याने सांगितले.

कृणाल पंड्यानेही या सीझनमध्ये अत्यंत चांगली सुरुवात केली असून, त्यानेही एक सुंदर ‘#BreakTheBeard’ लुक केला आहे. कृणाल म्हणाला की, ‘माझी ‘#BreakTheBeard’ मला पाठबळ देणाऱ्या सर्व मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आणि मागील काही वर्षांपासून अत्यंत उत्साहाने काम करणाऱ्या टीमसाठी आहे. बदललेल्या लुकमध्ये मला हार्दिकची ‘#BreakTheBeard’ स्टाइल आवडली. ऑन आणि ऑफ फिल्ड चांगले आणि ग्रूम केलेले दिसणे अत्यंत महत्त्वाचे आहे.’

मनिष पांडेऑरेंज आर्मीसाठी सज्ज असलेला मनिष पांडे म्हणाला की ‘शिखर आणि केन यांनी कायमच मैदानावर आदर्श ठेवला आहे आणि आपल्या ‘#BreakTheBeard’ लुक चेंजमुळे त्यांनी मैदानाबाहेरही आदर्श ठेवला आहे. त्यांच्या या देखण्या लुकमुळे मलाही ‘#BreakTheBeard’साठी आणि माझा ग्रुमिंग गेम सुधारण्यासाठी प्रेरणा मिळाली आहे.’

दिल्ली डेअरडेव्हिलचा विकेटकीपर ऋषभ पंत म्हणाला, ‘ऑफ दि फिल्ड काही मजा करून नवीन फेशियल हेअर स्टाइलमध्ये प्रयोग करताना मला खूप छान वाटते. अनेक खूप चांगले स्टाइल केलेले बिअर्डचे पर्याय उपलब्ध आहेत, मग तुम्ही स्वतःची वैयक्तिक स्टाइल न राखता इतरांसारखेच दिसण्यात काय अर्थ आहे.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link