Next
जवानांवरील हल्ल्याचा ‘पुण्यभूषण’कडून निषेध
प्रेस रिलीज
Saturday, February 16, 2019 | 02:30 PM
15 0 0
Share this article:

पुणे : काश्मीरमधील जवानांवरील दहशतवादी हल्ल्याचा पुण्यभूषण फाउंडेशनकडून निषेध करण्यात आला आहे. ‘हा हल्ला म्हणजे भारतीय लोकशाहीवरील हल्ला आहे. भारतीय सहनशीलतेची परीक्षा असून, आपण जशास तसे उत्तर देऊन जवानांच्या मृत्यूचा बदला घेतला पाहिजे’, अशी भावना ‘पुण्यभूषण’चे अध्यक्ष डॉ. सतीश देसाई यांनी पत्रकाद्वारे व्यक्त केली आहे आहे.

‘पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद संपविण्याची हीच वेळ असून, भारत सरकारने कडक पावले उचलून शहिदांच्या हौतात्म्याचा उचित सन्मान केला पाहिजे. पुण्यभूषण फाउंडेशन सर्व दहशतवादी कृत्यांचा निषेध करीत असून, शहीद जवानांप्रती आदरांजली व्यक्त करीत आहे,’ असे डॉ. देसाई यांनी या पत्रकात म्हटले आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search