Next
आम्ही कोण?
BOI
Thursday, March 01 | 04:30 PM
15 0 0
Share this storyआधुनिक कवितेचे जनक म्हणजे कवी केशवसुत . त्यांनी फुंकलेल्या ‘तुतारी’ने पुढे अनेक कवी आणि साहित्यिकांना प्रेरणा मिळाली. मराठी राजभाषा दिनानिमित्ताने ‘बाइट्स ऑफ इंडिया’च्या विशेष उपक्रमाचा भाग म्हणून ‘आम्ही कोण’ ही केशवसुतांची कविता आपल्यापुढे सादर केली आहे रत्नागिरीतील पत्रकार आणि गायक अभिजित नांदगावकर यांनी. हे सादरीकरण कवी केशवसुतांच्या मालगुंड (जि. रत्नागिरी) येथील जन्मस्थळी करण्यात आले आहे.
...........
आम्ही कोण म्हणूनि काय पुससी? आम्ही असू लाडके-

देवाचे, दिधले असे जग तये आम्हांस खेळावया;
विश्वी या प्रतिभाबले विचरतो चोहीकडे लीलया

दिक्कालांतुनि आरपार अमुची
दृष्टी पहाया शके
सारेही बडिवार येथिल पहा!
आम्हांपुढे ते फिके;


पाणिस्पर्शच आमुचा शकतसे
वस्तूंप्रती द्यावया –
सौंदर्यातिशया, अशी वसतसे जादू
करांमाजि या;

फोले पाखडिता तुम्ही, निवडितो
ते सत्त्व आम्ही निके!

शून्यामाजि वसाहती वसविल्या
कोणी सुरांच्या बरे?
पृथ्वीला सुरलोक साम्य झटती
आणावया कोण ते?
ते आम्हीच, सुधा कृतींमधुनिया
ज्यांच्या सदा पाझरे;
ते आम्हीच शरण्य, मंगल तुम्हां
ज्यांपासुनी लाभते!


आम्हांला वगळा-गतप्रभ झणी
होतील तारांगणे;
आम्हांला वगळा-विकेल
कवडीमोलावरी हे जिणे!

आम्ही कोण म्हणूनि काय पुससी? 
आम्ही असू लाडके-
- केशवसुत (कृष्णाजी केशव दामले)

(कवी केशवसुतांची पुस्तके बुकगंगा डॉट कॉमवरून घरपोच मागविण्यासाठी https://goo.gl/N1LUev येथे क्लिक करा. मराठी राजभाषा दिनानिमित्ताने ‘बाइट्स ऑफ इंडिया’वर प्रसिद्ध झालेले सर्व लेख, कविता आणि व्हिडिओ https://goo.gl/qgDdWU या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध असतील.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
प्रकाश प्रभाकरराव जोशीp About 72 Days ago
अति सुंदर कविता ऐकून बालपणीच्या शाळेतील आठवणी जाग्या झाल्या. * धन्यवाद*.
0
0

Select Language
Share Link