Next
रत्नागिरीत सलग १२ तास नृत्याविष्काराचे सादरीकरण
BOI
Monday, April 22, 2019 | 06:03 PM
15 0 0
Share this article:

गौरी शुक्लरत्नागिरी : रास नृत्यालय या संस्थेतर्फे जागतिक नृत्यदिनानिमित्ताने अखंड घुंगुरनाद- नादनिनाद हा अनोखा कार्यक्रम रंगणार आहे. यात भरतनाट्यम, कथ्थक आणि ओडिसी या तीन नृत्य प्रकारांचे सादरीकरण सलग १२ तास केले जाणार असून, यात सात ते ४५ वयोगटातील १०० कलाकार सहभागी होणार आहेत. हा कार्यक्रम २७ एप्रिल २०१९ रोजी सकाळी १० वाजल्यापासून रात्री १० वाजेपर्यंत शहरातील थिबा पॅलेस रस्त्यावरील जयेश मंगल पार्क येथे होईल.

रास नृत्यालयाच्या संचालिका श्रुती आठल्ये यांनी पत्रकार परिषदेत या संदर्भात माहिती दिली. रत्नागिरीत अशा प्रकारचा हा पहिलाच उपक्रम होत असून, यात स्थानिक कलाकारांबरोबरच पुण्यातील कलाकारांचाही सहभाग आहे. यामध्ये रत्नागिरीतील धनश्री मुरकर, सौख्यदा वैशंपायन, श्वेता सावंत, प्रणाली तोडणकर, तेजश्री भट, तसेच देवरुख येथील शिल्पा मुंगळे, चिपळूण येथील आर्या चितळे यांचा त्यांच्या शिष्यांसह नृत्याविष्कार होणार आहे. त्याचबरोबर पुण्यातील नेहा काळे व रिया दातार यांचे भरतनाट्यम तसेच गौरी शुक्ल यांचे ओडीसी नृत्याचे सादर करतील.

रिया दाताररत्नागिरीमध्ये नृत्य क्लास घेणारे अनेक गुरू आहेत. नर्तिकांना पुढे जाऊन स्वतः सादरीकरणासाठी व्यासपीठ मिळण्याची गरज आहे. बाहेरील कलाकारांचे सादरीकरण पाहता यावे यासाठी ‘रास’तर्फे त्रैमासिक नृत्यसभा आयोजित केली जाते. गेली २५ वर्षे रास नृत्यालयाच्या वतीने नृत्य वर्गाबरोबरच अन्य विविध उपक्रमही राबविले जात आहेत. कथ्थक नृत्य कार्यशाळा, उदयोन्मुख कलाकारांची त्रैमासिक सभा, नृत्यवर्गातील विद्यार्थिनींचे वार्षिक स्नेहसंमेलन यासारखे उपक्रम नृत्यालयातर्फे घेतले जातात. 

नेहा काळे‘दशावतार’ या कार्यक्रमाचा एक वेगळा पैलू असून, याचे नृत्यदिग्दर्शन श्रुती आठल्ये यांनी केले आहे. कार्यक्रमातील या संकल्पनेचे हा कथ्थकच्या पारंपरिक शिक्षणाबरोबरच प्रयोगशिलता राखत विद्यार्थिनींना सादरीकरणासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी रास नृत्यालय प्रयत्नशील आहे. सातत्याने कार्यक्रम राबवल्यास विद्यार्थी व पालकांची नृत्यातील करिअरबाबत दृष्टी तयार होऊ शकते. 

या कार्यक्रमाला नृत्यप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आयोजकांकडून आवाहन केले आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search