Next
‘शैक्षणिक संस्थांनी स्वतंत्रपणे कार्य करणे गरजेचे’
डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात राष्ट्रीय चर्चासत्र
प्रेस रिलीज
Monday, October 15 | 02:59 PM
15 0 0
Share this storyऔंध : ‘बदलत्या शैक्षणिक धोरणाचा विचार करताना प्रत्येक संस्थेने विद्यापीठावर अवलंबून न राहता, स्वतंत्रपणे कार्य करणे गरजेचे आहे. म्हणूनच शासनाने स्वायत्त धोरणाचा अवलंब केलेला दिसून येतो. अभ्यासक्रम हा शिक्षणाचा गाभा आहे. शिक्षणाला मर्यादा नाही. विद्यार्थ्यांच्या मनातील कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यांना सातत्यपूर्ण शिक्षण देणे गरजेचे आहे,’ असे प्रतिपादन नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर यांनी केले.

येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात मराठी व इंग्रजी विभागातर्फे ‘बदलती शैक्षणिक धोरणे व रयत शिक्षण संस्थेची वाटचाल’ या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्र आयोजित केले होते. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उच्च शिक्षण (पुणे विभाग) सहसंचालक डॉ. विजय नारखेडे होते. या वेळी रयत शिक्षण संस्थेचे पश्चिम विभागाचे अध्यक्ष अॅड. राम कांडगे, ज्येष्ठ लेखक, समीक्षक डॉ. दीपक बोरगावे, मीनल सासणे, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मंजुश्री बोबडे उपस्थित होत्या.  

डॉ. विद्यासागर म्हणाले, ‘शैक्षणिक क्षेत्रात येणाऱ्या अडचणींचे रूपांतर संधीमध्ये करायला पाहिजे. शिक्षण घेताना विद्यार्थ्यांनी विज्ञान तंत्रज्ञानाचा वापर करावा; तसेच  शिक्षकाने पुस्तकी ज्ञानाबरोबरच विद्यार्थ्यांना कौशल्ययुक्त शिक्षण द्यायला पाहिजे. विद्यार्थ्याने संकल्पनात्मक आणि कृतीपूर्ण शिक्षण घ्यायला हवे. आपण सर्वांनी बदलत्या शैक्षणिक धोरणांचा अवलंब करायला पाहिजे; तसेच विद्यार्थी प्राध्यापकांनी गुणात्मक आणि मूल्यात्मक संशोधन करायला पाहिजे.’मीनल सासणे यांनी कर्मवीर आण्णांच्या आयुष्यातील खाजगी आठवणींना उजाळा दिला. त्या म्हणाल्या, ‘पवार कुटुंबाची नाळ बहुजन समाजाशी जोडली गेली आहे. रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून ती अधिक वृद्धिंगत झाल्याचे दिसून येते. आम्ही लहान असताना कर्मवीर आण्णा आमच्या शेतात यायचे. शेतातील भाजीपाला वसतिगृहातील मुलांना घेऊन जायचे. ते आम्हाला शिक्षणासाठी वसतिगृहात घेऊन येत. तेव्हापासून आजतागायत रयत शिक्षण संस्थेची जोडलेली नाळ पवार कुटुंबाने टिकवून ठेवली आहे.’

ज्येष्ठ लेखक, समीक्षक डॉ. दीपक बोरगावे म्हणाले, ‘बदलत्या शिक्षण पद्धतीत गरीबांपासून शिक्षण वंचित केले जात आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सुरू केलेल्या ‘कमवा व शिका’ योजनेमुळे श्रमाची प्रतिष्ठा जोपासली जात आहे. सामाजिक, शैक्षणिक, राजकीय परिस्थिती झपाट्याने बदलत चालली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनगट आणि मेंदू यांचा विकास करायला हवा; तसेच समाजात सांस्कृतिक परिवर्तन होण्यासाठी आपण व्यवस्थेला प्रश्न विचारायला हवेत.’कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देत अॅड. कांडगे म्हणाले, ‘बहुजन समाजाच्या उद्धारासाठी चार ऑक्टोबर १९१९ रोजी काले सातारा येथे रयत शिक्षण संस्थेची स्थापना करून कर्मवीर अण्णांनी बहुजन समाजात शैक्षणिक क्रांती घडवून आणली. बहुजन समाजातील विद्यार्थ्यांसाठी शाहू बोर्डाची स्थापना केली. तेव्हा महात्मा गांधी म्हणाले की, भाऊराव जे मला साबरमती आश्रमात करता आले नाही. ते तुम्ही या ठिकाणी करून दाखवले. त्यामुळे तुमचे कार्य निश्चितच कौतुकास्पद आहे; तसेच १९३२ साली गांधी-आंबेडकर यांच्यात पुणे करार झाला. या करारानंतर कर्मवीरांनी पांडवनगर या ठिकाणी युनियन बोर्डिंगची स्थापना केली. त्यामुळे रयत शिक्षण संस्थेला त्यागाची आणि कष्टाची परंपरा असल्याचे दिसून येते. रयत शिक्षण संस्था ही सामाजिक परिवर्तनाची कार्यशाळा आहे.’  

महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. बोबडे म्हणाल्या, रयत शिक्षण संस्थेच्या शताब्दी महोत्सवी वर्षानिमित्त महाविद्यालयामध्ये विविध उपक्रम सुरू असून, त्याचाच एक भाग म्हणून हे एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र घेण्यात आले आहे. जागतिकीकरण, खाजगीकरण आणि उदारीकरणात सामाजिक शैक्षणिक आणि राजकीय बदल झपाट्याने होत आहेत. त्यामुळे बदलती शैक्षणिक धोरणे कोणती आहेत. आणि रयत शिक्षण संस्थेची १९१९ पासून आजपर्यंतची वाटचाल या अनुषंगाने विचार मंथन करण्याच्या निमित्ताने हे चर्चासत्र घेण्यात आले. यासाठी महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राबाहेरील विविध महाविद्यालयातील संशोधक, अभ्यासकांनी आपले शोधनिबंध सादर करून, बदलत्या शैक्षणिक धोरणांवर आणि रयत शिक्षण संस्थेच्या वाटचालीवर प्रकाश टाकला आहे.’

या चर्चासत्राचे समन्वयक मराठी विभाग प्रमुख डॉ. संजय नगरकर आणि इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. सविता पाटील यांनी हे चर्चासत्र यशस्वीपणे आयोजित केले. यात डॉ. सुधाकर शेलार, प्राचार्य डॉ. शोभा इंगवले, प्राचार्य डॉ. श्रीमती मगदूम, उपप्राचार्य डॉ. विलास सदाफळ, डॉ. सुप्रिया पवार, डॉ. तानाजी हातेकर, डॉ. सुहास निंबाळकर, प्रा. एकनाथ झावरे, प्रा. किरण कुंभार, प्रा. मयूर माळी, प्रा. कुशल पाखले, प्रा. भक्ती पाटील, प्रा. सायली गोसावी, प्रा. नलिणी पाचर्णे, प्रा. हर्षकुमार घळके, प्रा. प्रदीप भिसे, डॉ. अतुल चौरे यांनी सक्रिय सहभाग घेतला.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Dr. Atul Choure About 77 Days ago
अप्रतिम... सुंदर बातमी..
0
0
प्रा.डॉ. अतुल चौरे About 95 Days ago
सर नमस्कार.. आपण दिलेली बातमी मिळाली.. खूप सुंदर बातमी दिलीत. त्याबद्दल मनापासून धन्यवाद...
0
0
Dr. Atul Choure About 96 Days ago
Very Nice News..💐👏😀👍
0
0

Select Language
Share Link