Next
शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर
पाचवीचा २२.९७ टक्के, आठवीचा १२.५७ टक्के निकाल
BOI
Tuesday, August 07, 2018 | 05:51 PM
15 1 0
Share this story

प्रातिनिधिक फोटोपुणे : ‘महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे’तर्फे १८ फेब्रुवारी २०१८ रोजी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक (पाचवी) व पूर्व माध्यमिक (आठवी) शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल सहा ऑगस्टला जाहीर झाला.

या परीक्षेचा तात्पुरता निकाल २१ जून २०१८ रोजी जाहीर करण्यात आला होता. त्यानंतर १० जुलैपर्यंत गुणपडताळणीसाठीचे अर्ज संबंधित शाळेमार्फत ऑनलाइन मागवण्यात आले होते. परिषदेकडे विहित मुदतीत ऑनलाइन आलेल्या परिपूर्ण अर्जांवरून संबंधित विद्यार्थ्यांच्या गुणांची पडताळणी करून अंतिम निकाल तयार करण्यात आला. यानुसार शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांची यादी तयार करण्यात आली. अंतिम निकाल सहा ऑगस्टला ऑनलाइन जाहीर करण्यात आला. या परीक्षेसाठी प्रथम भाषा, गणित, तृतीय भाषा, बुद्धिमत्ता चाचणी अशी ३०० गुणांची परीक्षा होते. विद्यार्थ्यांना आपला निकाल परिषदेच्या वेबसाइटवर पाहता येईल. त्यासाठी येथे क्लिक करा.

इयत्ता पाचवी
नोंदणी केलेले विद्यार्थी : ४,८८,८५१
उपस्थित विद्यार्थी : ४,७२,६१०
अनुपस्थित विद्यार्थी : १६,२४१
पात्र विद्यार्थी : १,०८,५६०
शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी : १६,५९६
निकाल (पात्र विद्यार्थी संख्येनुसार) : २२.९७ टक्के

इयत्ता आठवी
नोंदणी केलेले विद्यार्थी : ३,७०,२४३
उपस्थित विद्यार्थी : ३,५८,८४८
अनुपस्थित विद्यार्थी : ११,३९५
पात्र विद्यार्थी : ४५,१०३
शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी : १३,७५९
निकाल (पात्र विद्यार्थी संख्येनुसार) : १२.५७ टक्के
 
15 1 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link