Next
ऑरबिस शाळेत ‘टेड टॉक्स’चे आयोजन
BOI
Monday, November 12, 2018 | 05:04 PM
15 0 0
Share this article:

‘टेड एक्स ऑरबिस’ कार्यक्रमात सहभागी झालेले मान्यवर

पुणे : नवीन संकल्पना, हटके विचार, जागतिक स्तरावर प्रसिद्ध असणारे वक्ते यामुळे जागतिक स्तरावरील  विचारांचे व्यासपीठ म्हणून ‘टेड टॉक्स’ प्रसिद्ध आहे. याच धर्तीवर येथील ऑरबिस शाळेमध्ये ‘टेड एक्स ऑरबिस’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ‘आय थिन्क अँड देअरफोर आय अॅम’ या संकल्पनेवर आधारीत या कार्यक्रमात वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या वक्त्यांचे विचार विद्यार्थ्यांना ऐकायला मिळाले. 

यामध्ये शिक्षणापासून वंचित असणाऱ्या मुलांना शिकवणारे आय. आय. टी मुंबईचे विद्यार्थी नितीन रोडेकर यांनी ‘ ग्रामीण भागातील शिक्षण’ यावर आपले विचार मांडले. ए.एफ.एम.सी चे ले. कर्नल शशिकांत शर्मा यांनी आयुष्यात यशस्वी होण्यासाठी ‘थिंक अॅज अ प्रोफेशनल’ हे सूत्र वापरले पाहिजे, असे सांगितले. आयुष वटाळ या बारा वीतल्या विद्यार्थ्याने ‘विज्ञाना मागची कल्पना’ यावर, तर   गोपिकाश्री संपतकुमार या विद्यार्थिनीने ‘सेन्सॉरशिप’वर आपले विचार प्रकट केले. सॉफ्टवेअर इंजिनिअर विनीत जैन यांनी भारतामधल्या ‘ह्युमनॉइड रोबोट्स अँड फॉर फ्यूचर’ या विषयवर आपले मत मांडले.

या वेळी शाळेच्या मुख्याधापिका माला जेटली म्हणाल्या ‘हा कार्यक्रम अतिशय यशस्वीरित्या पार पडला. अर्थपूर्ण संभाषणांची ही तर एक सुरुवात आहे. अशाच प्रकारे शाळा चर्चांमध्ये आपला सहभाग व योगदान देत राहील.’

या कार्यक्रमाच्या ‘वक्ते निवड समिती’ मध्ये लेखिका सुधा मेनन, इंडियन आर्ट गॅलरीचे संस्थापक मिलिंद साठे, आययूसीएचे शास्त्रज्ञ रंजीव मिश्रा या मान्यवरांचा समावेश होता. या वेळी विद्यार्थ्यांनी गायन, नृत्य, तसेच जॅझ बँडचे सादरीकरण केले. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search