Next
‘क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मृतिकेंद्राच्या आराखड्याला मंजुरी’
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची धरणगाव येथे घोषणा
प्रेस रिलीज
Friday, February 22, 2019 | 05:40 PM
15 0 0
Share this article:जळगाव : ‘धरणगाव येथे उभारण्यात येणाऱ्या क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मृतिकेंद्रासाठी तयार केलेल्या १५ कोटींच्या आराखड्यास मंजुरी देण्यात येत आहे. या केंद्राच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनांची माहिती आदिवासी बांधवांपर्यंत पोहोचविण्यात यावी. सुशिक्षित आणि सक्षम युवापिढी घडविण्यासाठी क्रांतिकारी आणि प्रेरणादायी विचार समाजापर्यंत पोहोचविले जावे,’ असे प्रतिपादन मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांनी केले.

धरणगाव येथे क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मृतीसंस्थेतर्फे आयोजित जनजाती मेळाव्यात ते बोलत होते. या वेळी सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, राष्ट्रीय स्वयंसेवक सह कार्यवाहक भैयाजी जोशी, श्री. नायराणस्वामी, संस्थेचे अध्यक्ष भाईदास सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले, ‘क्रांतीकारी खाज्याजी नाईक यांनी इंग्रजांचा अफूचा व्यापार उध्वस्त करून त्यांना ‘सळो की पळो’ करून सोडले. या व्यापारातून निर्माण झालेली इंग्रजांची संपत्ती भारतीयांवर अत्याचार करण्यासाठी वापरण्यात येवू नये, असा त्यांचा प्रयत्न होता. त्यांच्या स्मृतीत आदिवासी बांधवांसाठी लोकोपयोगी केंद्र उभे राहावे, ही सर्वांसाठी गौरवाची बाब आहे. जनजाती समाजाचा  इतिहास गौरवशाली आहे. जल, जमीन आणि जंगल रक्षणाचे कार्य या समाजाने केले. अनेक संस्थांच्या माध्यमातून समाजाला उपयुक्त असणारे कार्य करताना पारतंत्र्यात इंग्रजांविरुद्ध जोमाने लढा दिला. बाबुराव शणलाके आणि भिमा नाईक यासारख्या क्रांतिकारकांचे कार्य उल्लेखनीय आहे.’

आदिवासी कल्याणासाठी शासन विविध कल्याणकारी योजना राबवित आहे. वनपट्यांचे मोठ्या प्रमाणात वाटप करण्यात आले आहे. ५० हजार आदिवासी विद्यार्थ्यांना इंग्रजी नामांकीत शाळेत शिकण्याची संधी मिळाली आहे. पेसामधील आदिवासी गावांना पाच टक्के निधी थेट देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. या निधीमुळे आदिवासी गांवाच्या विकासाला गती मिळेल. वनावर आदिवासींचा हक्क असावा यासाठी शासनाचे प्रयत्न असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.जोशी म्हणाले, ‘सर्व भारतीय एक असून, देशाच्या स्वातंत्र्यासाठी क्रांतिकारकांनी केलेले बलिदान देशासाठी प्रेरणदायी आहे. समाजातील वंचित घटकांच्या सर्वांगीण कल्याणासाठी प्रयत्न होत असून, शासनासोबत सामाजिक संस्थानी कर्तव्यभावनेने पुढे आले पाहिजे. क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मृतिकेंद्र विकासासाठी प्रेरक ठरेल.’ केंद्रासाठी तयार केलेल्या आरखाड्यास मंजुरी दिल्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले.

या नंतर नारायणस्वामी यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला खासदार ए. टी. पाटील, आमदार स्मिता वाघ, चंदूलाल पटेल, शिरीष चौधरी, सुरेश भोळे, उन्मेष पाटील, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शरद ढोले, राजेश पाटील, चैत्राम पवार आदी उपस्थित होते.

फडणवीस यांच्या हस्ते क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मृतिकेंद्राचे भूमिपूजन करण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी खाज्याजी नाईक समाधीस्थळाचे दर्शन घेतले. तत्पूर्वी त्यांचे हेलिपॅडवर आगमन झाल्यानंतर सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, आमदार श्रीमती वाघ, अपर जिल्हाधिकारी गोरक्षनाथ गाडीलकर यांनी स्वागत केले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search