Next
आज सर्वात मोठी रात्र; तब्बल १३ तास ३ मिनिटे
BOI
Friday, December 21, 2018 | 11:48 AM
15 0 0
Share this article:

पुणे : सूर्याचे उत्तरायण सुरू होत असल्याने, शुक्रवार,२१ डिसेंबरची रात्र ही सर्वात मोठी रात्र आहे. तब्बल १३ तास ३ मिनिटांची ही रात्र असणार आहे, तर दिवस सर्वात लहान म्हणजे १० तास ५७ मिनिटांचा असेल. 

शनिवारपासून दिवस मोठा होईल.  शुक्रवारी, उत्तररात्री ३ वाजून ५२ मिनिटांनी सूर्याचा मकर राशीत प्रवेश होईल, आणि उत्तरायणाला सुरुवात होईल. दरवर्षी २१ मार्च आणि २३ सप्टेंबर या दिवशी सूर्य विषुववृत्तावर असल्यामुळे दिवस व रात्र समान असते, तर २१ जून रोजी दिवस मोठा असतो आणि त्या दिवशी रात्र सर्वात लहान असते. 

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search