Next
युवा आंबेडकरी शाहीर सागर गोरखेंना लोकशाहीर अण्णा भाऊ साठे शाहिरी पुरस्कार
मिलिंद जाधव
Saturday, August 03, 2019 | 05:29 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : यंदाचा लोकशाहीर अण्णा भाऊ साठे शाहिरी पुरस्कार युवा आंबेडकरी शाहीर सागर गोरखे यांना नुकताच प्रदान करण्यात आला. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या ९९व्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘सांगड’ या कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. 

दादरच्या रवींद्र नाट्यमंदिरात हा कार्यक्रम पार पडला. पुरस्काराचे मानकरी शाहीर सागर गोरखे हे कबीर कला मंच या सांस्कृतिक संघटनेचे अध्यक्ष असून, गेल्या १५ वर्षांपासून शाहिरीच्या माध्यमातून ते प्रबोधनाचे कार्य करीत आहेत. अण्णा भाऊ साठे, वामनदादा कर्डक, विलास घोगरे, शंतनू कांबळे अशा शाहिरांचा वारसा पुढे नेऊन त्यांनी शेकडो गाणी, कथा, कविता यांच्या माध्यमातून आपला साहित्यठसा उमटवला आहे. 

‘सागर गोरखे हे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा शाहिरी वारसा खऱ्या अर्थाने पुढे घेऊन जात असून, आज जाती-धर्मावर आधारित वाढता हिंसाचार, लोकशाही अधिकारांचे हनन, अशा घटना घडत असताना समाजाला प्रबोधित करण्याचे मोलाचे कार्य करीत आहेत. त्यामुळे त्यांचा यथोचित सन्मान व्हावा म्हणून आम्ही यंदाचा पुरस्कार त्यांना प्रदान करीत आहोत,’ अशी भूमिका आयोजक शशांक बामनोलकर यांनी मांडली. 

या पुरस्कार प्रदान सोहळ्यात सुरेश सावंत यांनी आपले विचार मांडले. सागर भालेराव, रूपाली जाधव, जयेश पवार, सविता पाटील, रणजित झेंडे, शेखर बेडेकर, पवन घोंगडे यांनादेखील सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाची सांगता समता कला मंच व कबीर कला मंच यांच्या संयुक्त शाहिरी जलशाने करण्यात आली.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search