Next
दामले विद्यालयाला सर्वसाधारण नैपुण्यपद
रत्नागिरी नगर परिषद आंतरशालेय क्रीडा स्पर्धा
BOI
Monday, January 14, 2019 | 11:26 AM
15 0 0
Share this article:

आंतरशालेय क्रीडा स्पर्धेचे सर्वसाधारण नैपुण्यपद पटकावलेली शाळा क्रमांक १५ दामले विद्यालय. (सर्व छायाचित्रे : कांचन मालगुंडकर))

रत्नागिरी : नगरपालिका शाळांच्या ४० व्या आंतरशालेय क्रीडा स्पर्धेचे सर्वसाधारण नैपुण्यपद शाळा क्रमांक १५ दामले विद्यालयाने पटकावले. मुलांचे नैपुण्यपदही याच शाळेने पटकावले असून, शाळा क्रमांक २१ राष्ट्रपिता महात्मा गांधी विद्यालयाने मुलींचे नैपुण्यपद पटकावले. या स्पर्धांचा समारोप आणि बक्षीस वितरण समारंभ ११ जानेवारीला शहरातील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर झाला.

या प्रसंगी महिला व बालकल्याण समिती सभापती मीरा पिलणकर, रत्नागिरी ‘डीआयईसीपीडी’च्या अधिव्याख्याता स्नेहल पेडणेकर, प्रशासन अधिकारी सुधाकर मुरकुटे यांच्यासह क्रीडाप्रमुख यासीन जमादार, क्रीडा उपप्रमुख बशीर ढालाईत, स्नेहाली मयेकर, सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख विजय पंडित, उपप्रमुख प्राजक्ता कळंबटे, सर्व शाळांचे मुख्याध्यापक आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन मंजिरी लिमये यांनी केले.

स्पर्धेचा निकाल अनुक्रमे असा : फॅन्सी ड्रेस- शाळा क्र. १३, शाळा क्र. १५, शाळा क्र. नऊ, शाळा क्र. १२, शाळा क्र. पाच. सांस्कृतिक कार्यक्रम- लहान गट- शाळा क्र. ११ व १२, शाळा क्र. १२, मोठा गट- शाळा क्र. १५, शाळा क्र. दोन, शाळा क्र. १७, उत्तेजनार्थ- शाळा क्र. १९, शाळा क्र. नऊ. बुद्धिबळ (मुले) विजयी- प्रेम दिलीप गोसावी (शाळा क्र. सात), उपविजयी- नीरज दौलत लाड (शाळा क्र. २१). मुली (विजयी)- आशिया इरशाद अत्तरवाले (शाळा क्र. २१), उपविजयी- जुमाबी अकबर शिरगांवकर, (शाळा क्र. १०).संचलन स्पर्धा- गट छोटा- शाळा क्र. १३, शाळा क्र. ११ व १२, शाळा क्र. सहा, उत्तेजनार्थ- शाळा क्र. २०. मोठा गट- शाळा क्र. १५, शाळा क्र. दोन, शाळा क्र. २१. उत्तेजनार्थ- शाळा क्र. १०, द्वितीय- शाळा क्र. २२. गट क्र. एक- ५० मीटर धावणे (मुले)- आमेसाई भरमाणा गोरल (शाळा क्र. १५), प्रीतम सुनील चव्हाण, (शाळा क्र. आठ), शाहीद अब्दुल सय्यद (शाळा क्र. २१). (मुली)- आलिया मकदूम मलिक (शाळा क्र. १८), रेणुका जयबहाद्दूर शाहा (शाळा क्र. दोन), अयमान सलीम मजगांवकर (शाळा क्र. १०).

१०० मीटर धावणे (मुले)- इम्तियाज शब्बीर हिप्परी (शाळा क्र. सात), शैबाज आतीफ चौधरी (शाळा क्र. २२), रेहान रजाक सय्यद (शाळा क्र. २१). मुली- सलोनी अनंत घोसाळे, (शाळा क्र. १९), सोनाली सिद्दराम जमादार (शाळा क्र. २१), अप्सरा अल्फाज गोदड (शाळा क्र. नऊ). २०० मीटर धावणे (मुले)- इम्तियाज शब्बीर हिप्परी (शाळा क्र. सात), शैबाज आतिफ रहेमान चौधरी (शाळा क्र. २२), शाळा क्र. १०; (मुली)- आफिया शाहीद पठाण (शाळा क्र. नऊ), सिद्धी सुनील जाधव (शाळा क्र. १५), रुचिता मिनेश सावंत (शाळा क्र. दोन). थाळीफेक (मुले)- अनस निजामुद्दिन खान (शाळा क्र. १८), आदित्य शंकर शिर्के (शाळा क्र. सात), प्रेम रजनीकांत पवार (शाळा क्र. १५) मुली- निशा सुरेश काळे (शाळा क्र. सात), दीपाली उत्तम पवार (शाळा क्र. १५), सोनिया हाजी मस्तान निंबाळ (शाळा क्र. २२). गोळाफेक (मुले)- शहबाज अनिकूर रहेमान चौधरी (शाळा क्र. २२), आदित्य शंकर शिर्के (शाळा क्र. सात), महंमद रजाक जमाल खान (शाळा क्र. १८). मुली- कमलदीप मुखासिंग कौर (शाळा क्र. १५), रोशनी किसन राठोड (शाळा क्र. दोन), मुस्कान म. तालीब शेख (शाळा क्र. १८).सांघिक स्पर्धा विजयी, उपविजयी अनुक्रमे : मारचेंडू- शाळा क्र. सात, शाळा क्र. आठ. लंगडी- शाळा क्र. २१, शाळा क्र. १५. रस्सीखेच (मुले)- शाळा क्र. १५, शाळा क्र. १०. मुली- शाळा क्र. १५, शाळा क्र. २१. ४ बाय ५० रिले (मुले)- शाळा क्र. १५, शाळा क्र. १०. मुली- शाळा क्र. २१, शाळा क्र. १०. खो-खो (मुले)- शाळा क्र. १५, शाळा क्र. सात. मुली- शाळा क्र. २१, शाळा क्र. १५. कबड्डी (मुले)- शाळा क्र. १५, शाळा क्र. १९. मुली- शाळा क्र. २१, शाळा क्र. नऊ. ४ बाय १०० रिले (मुले)- शाळा क्र. १५, शाळा क्र. २१. मुली- शाळा क्र. आठ, शाळा क्र. १०. व्हॉलीबॉल (मुले)- शाळा क्र. १५, शाळा क्र. २१. मुली- शाळा क्र. १५, शाळा क्र. २१.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Sujata Shinde About 274 Days ago
Cogruchlation all of you
0
0
Yogesh kadam About 277 Days ago
Khup khup abhinandan. Damale vidyalay is always rock in Academic and sports.
0
0

Select Language
Share Link
 
Search