Next
शिरीष कणेकर, म. ना. अदवंत, हेमंत देसाई, आनंद जातेगावकर
BOI
Wednesday, June 06, 2018 | 03:45 AM
15 0 0
Share this article:

लोकप्रिय सिनेअभ्यासक आणि विनोदी लेखक शिरीष कणेकर, ललित लेखक महादेव अदवंत, बाबूमोशाय नावानं सिनेविषयक सदरं लिहिणारे पत्रकार हेमंत देसाई आणि कथाकार आनंद जातेगावकर यांचा सहा जून हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांचा अल्प परिचय...
...

शिरीष कणेकर

सहा जून १९४३ रोजी जन्मलेले शिरीष कणेकर हे पत्रकार असून, प्रामुख्यानं हिंदी सिनेमा, हिंदी सिनेसंगीत आणि क्रिकेट या विषयांवर अभ्यासपूर्ण आणि खुसखुशीत, विनोदी शैलीत लेखन करणारे म्हणून लोकप्रिय आहेत. ते सादर करत असलेले ‘माझी फिल्लमबाजी’, ‘फटकेबाजी’ आणि ‘कणेकरी’ हे ‘स्टँड-अप टॉक शो’ अफाट गाजले आहेत आणि त्यांना उच्चांकी लोकप्रियता लाभली आहे. 

यादों की बारात, शिरीषासन, सिनेमाबाजी, मुद्दे आणि गुद्दे, चहाटळकी, सूरपारंब्या, सिनेमागिरी, लगाव बत्ती, कणेकरी, चिमटे आणि गालगुच्चे, आसपास, मेतकूट, चित्ररूप, कल्चर व्हल्चर, असं त्यांचं विविध वृत्तपत्रांमधलं स्तंभलेखन गाजलं.

गाये चला जा, यादों की बारात, एक्केचाळीस, गोली मार भेजे मे, गोतावळा, कुरापत, मखलाशी, फटकेबाजी, पुन्हा यादों की बारात, टिवल्या बावल्या, चंची, चापटपोळी, चापलुसकी, डॉलरच्या देशा, एकला बोलो रे, रहस्यवली, सूरपारंब्या, इरसालकी, क्रिकेटवेध, नट बोलट बोलपट, शिणेमा डॉट कॉम, अशी त्यांची पुस्तकं लोकप्रिय आहेत. त्यांना विद्याधर गोखले पुरस्कार, चिं. वि. जोशी पुरस्कार असे सन्मान प्राप्त झाले आहेत. 

(शिरीष कणेकर यांची पुस्तकं ‘बुकगंगा डॉट कॉम’ वरून घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा.)
............

महादेव नामदेव अदवंत

सहा जून १९१४ रोजी जन्मलेले महादेव नामदेव अदवंत हे ललित लेखक आणि संपादक म्हणून ओळखले जातात. 

संजीवनी, माणुसकीचा धर्म, मनाचे संकल्प, मनाची मुशाफिरी, विराटपर्व, महाराष्ट्रलक्ष्मी, प्रदक्षिणा, असं त्यांचं लेखन प्रसिद्ध आहे. 

१६ मे १९९९ रोजी त्यांचा मृत्यू झाला.

(म. ना. अदवंत यांची पुस्तकं ‘बुकगंगा डॉट कॉम’ वरून घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा.)

......

हेमंत देसाई

सहा जून १९५६ रोजी जन्मलेले हेमंत देसाई हे पत्रकार आणि ललित लेखक म्हणून ओळखले जातात. ‘बाबूमोशाय’ या टोपण नावाने ते चित्रपटविषयक लेख लिहितात.

शहेनशहा, चांदरात, सुहाना सफर, कंगालांचे अर्थशास्त्र, भोवळ, असं त्यांचं लेखन प्रसिद्ध आहे. 

(हेमंत देसाई यांची पुस्तकं ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा.)
.......

आनंद विनायक जातेगावकर

सहा जून १९४५ रोजी जन्मलेले आनंद विनायक जातेगावकर हे कथाकार आणि कादंबरीकार म्हणून ओळखले जातात. त्यांचं सुरुवातीचं लेखन ‘सत्यकथा’ आणि ‘मौज’मधून प्रसिद्ध झालं होतं. 

अभिनयाचे प्राथमिक सहा पाठ, अस्वस्थ वर्तमान, कैफियत, ज्याचा त्याचा विठोबा, डॉ. मयंक अर्णव, दोन जुने अभिजात अर्थशास्त्रीय निबंध, बाहू उभारून दोन, मी मी ऊर्फ सेल्फी, मुखवटे, व्यासांचा वारसा, श्रीमंत गोपिकाबाईंची बखर, अशी त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत.

त्यांना राज्य शासनाचा पुरस्कार, तसंच राम गणेश गडकरी पुरस्कार लाभला आहे.

२४ जानेवारी २०१६ रोजी त्यांचा ठाण्यात मृत्यू झाला.

(दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search