Next
भारतीय सशस्त्र सैन्यदलात भरतीसाठी नाशिक येथे पूर्व प्रशिक्षणाची सुवर्णसंधी
प्रेस रिलीज
Wednesday, July 05, 2017 | 05:04 PM
15 0 0
Share this article:

प्रातिनिधिक फोटो
मुंबई : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना ‘एसएसबी’ या परीक्षेची पूर्वतयारी करून घेण्यासाठी नाशिकमधील छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र येथे राज्य सरकारतर्फे महाराष्ट्रातील युवक व युवतींसाठी २५ जुलै ते तीन ऑगस्ट २०१७ या कालावधीत पूर्वप्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये प्रशिक्षणार्थींची निवास, भोजन व प्रशिक्षणाची नि:शुल्क सोय करण्यात आलेली आहे.

इच्छुक व पात्र उमेदवारांनी २० जुलै रोजी सकाळी ११ वाजता मुंबईतील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात मुलाखतीस हजर रहावे. मुलाखतीस येण्याआधी पीसीटीसी ट्रेनिंगच्या ‘गुगल प्लस पेज’वर किंवा सैनिक कल्याण विभाग, पुणे यांच्या www.mahasainik.com या वेबसाइटवरील रिक्रुटमेंट टॅबवर क्लिक करून त्यामधील उपलब्ध चेकलिस्ट आणि महत्त्वाच्या तारखा यांचे अवलोकन करावे. त्याची दोन प्रतींमध्ये प्रिंट काढून, तसेच त्यामध्ये दिलेले सर्व परिशिष्ट डाउनलोड करून त्यांचीही दोन प्रतींमध्ये प्रिंट काढून ते पुर्ण भरून आणणे आवश्यक आहे. तसेच एसएसबी प्रवेश वर्गासाठीची खालीलप्रमाणे कोणतीही एक पात्रता आवश्यक आहे व या संबंधीचे पात्रता प्रमाणपत्र कोर्सला येताना घेऊन येणे आवश्यक आहे.

कम्बाइंड डिफेन्स सर्व्हिसेस परीक्षा अथवा नॅशनल डिफेन्सस ॲकेडमी परीक्षा पास झालेली असावी व त्यासाठी सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखतीसाठी पात्र झालेले असावे. एनसीसी (सी) सर्टिफिकेट ए/बी ग्रेडमध्ये पास झालेले असावे व एनसीसी ग्रुप हेडक्वार्टरने ‘एसएसबी’साठी शिफारस केलेली असावी. टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्ससाठी एसएसबी मुलाखतीसाठी कॉल लेटर असावे. युनिव्हर्सिटी एंट्री स्कीमसाठी एसएसबी कॉल लेटर आलेले असावे अथवा ‘एसएसबी’साठी शिफारस केलेल्या यादीत नाव असावे.

अधिक माहितीसाठी संपर्क :
प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक
फोन : (०२५३) २४५१०३१/३२
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search