Next
डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात ‘रिसर्च आविष्कार’ स्पर्धा
BOI
Saturday, September 28, 2019 | 04:21 PM
15 0 0
Share this article:


पुणे : औंध येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात नुकतीच ‘रिसर्च आविष्कार’ स्पर्धा पार पडली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील भूगोल विभागचे प्रमुख डॉ. रवींद्र जायभाय आणि एस. एम. जोशी महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागातील डॉ. शरद पासले यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन झाले. 

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. जायभाय म्हणाले, ‘आपले काम सुलभ व्हावे, यासाठी आपण जी नवीन आयडिया शोधून काढतो त्याला ‘रिसर्च आविष्कार’ म्हणतात. थंडी वाजू नये म्हणून मानवाने उपारणे, मफलर, कानाची पट्टी असे वेगवेगळे शोध लावले आहेत. मानवाने चंद्रावर जाण्यापर्यंतची जी प्रगती केली आहे. ती केवळ रिसर्च आविष्कारच्या माध्यमातून केली आहे. 

डॉ. शरद पासले म्हणाले, ‘प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात कोणती ना कोणती तरी आयडीया असते. त्याच्या माध्यमातून मानवाचे जीवन सुखकर होते. लिहिताना मजा यावी म्हणून सुगंधी पेनाचा शोध लावलेला दिसतो. वर्गात विद्यार्थ्याने झोपू नये. म्हणून बेंच व्हायब्रेट केला जातो; तसेच दुबईत हॉटेलमध्ये स्वागतासाठी रोबोटचा वापर केला जातो. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनातील कोणतीही नाविन्यपूर्ण आयडिया हा रिसर्च आविष्कारच असतो.’ 


कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे म्हणाले, ‘प्रत्येक माणसात एक संशोधक उपजतच दडलेला असतो. त्यामुळेच लहान मुल कुतूहलापोटी अनेक प्रश्न विचारत असते. त्याचप्रमाणे मानवाने कुतूहलापोटी अनेक शोध लावले आहेत. तरुणांच्या बुद्धीला चालना देण्यासाठी पुणे विद्यापीठाप्रमाणेच, रयत शिक्षण संस्थेने, रयत विज्ञान परिषदेची स्थापना करून त्याअंतर्गत २८ प्रकल्प सुरू केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून महाविद्यालयात रिसर्च आविष्कार स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, यामधून एखादा शास्त्रज्ञ निर्माण होईल.’ 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. कुशल पाखले यांनी, तर पाहुण्यांची ओळख प्रा. आसावरी शेवाळे यांनी करून दिली. सूत्रसंचालन डॉ. सुहास निंबाळकर यांनी केले, तर प्रा. अविनाश जाधव यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी प्राध्यापकांबरोबरच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search