Next
‘आबरा का डाबरा’तर्फे पुण्यात ‘गा रे माँ’ नाटक
प्रेस रिलीज
Thursday, February 21, 2019 | 03:49 PM
15 0 0
Share this article:

पुणे : नवनवीन नाटके व विविध धाटणीच्या कला पुणेकरांसमोर सतत सादर करणारे आबरा का डाबरा इव्हेंटस अॅंड एंटरटेन्मेंटतर्फे ‘गा रे माँ’ या संगीतमय नाटकाचा प्रयोग दोन मार्च २०१९ रोजी सायंकाळी सात वाजता पुण्यातील नेहरू मेमोरियल हॉल येथे होणार आहे.

या नाटकात प्रख्यात मराठी, तसेच हिंदी रंगमंच, चित्रपट आणि दूरदर्शन अभिनेत्री भारती आचरेकर, पार्श्‍वगायिका, नृत्यांगना आणि अभिनेत्री सुनीता रावसह ऋतुराज शिंदे, डॅनी सुरा, झयान मेरी खान आणि असीम हट्टंगडी आदी कलाकारांचा समावेश असणार आहे. या नाटकाचे दिग्दर्शन अनाहिता उबेरॉयने केले असून, संकल्पना इशिता अरूण यांची आहे.

संगीताच्या जादूने केळकर आणि पीटर या दोन कुटुंबातील महिलांची कशी गाठ पडते ही या नाटकाची कथा आहे. प्रेक्षकांना या नाटकाच्या माध्यमातून संगीताची विनोदी जुगलबंदी अनुभवायला मिळणार आहे.

नाटकाविषयी :
दिवस :
दोन मार्च २०१९
वेळ : सायंकाळी सात वाजता
स्थळ : नेहरू मेमोरियल हॉल, पुणे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search