Next
दप्तर होणार हलके...
माधुरी शहाणे यांच्या ‘क्युआर कोड’च्या कल्पनेस मंजुरी...
BOI
Tuesday, July 24, 2018 | 05:54 PM
15 0 0
Share this article:


शालेय विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे ओझे कमी करण्यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेने (एनसीईआरटी) एक नवे धोरण राबवण्याचे ठरवले आहे. यासाठी आता क्विक रिस्पॉन्स (क्यूआर) कोडचा वापर करण्यात येणार आहे. पुण्याच्या माधुरी शहाणे यांनी ही क्यूआर कोडची संकल्पना मांडली होती. त्यास मंजुरी देण्यात आली आहे. 

२०१९च्या शैक्षणिक वर्षापासून पहिली ते बारावीच्या पाठ्यपुस्तकांमध्ये ही पद्धत वापरण्याचे ठरविण्यात आले आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी यानुसार ‘एनसीईआरटी’च्या अधिकाऱ्यांना कार्यगट स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. ‘एनसीईआरटी’च्या कार्यकारिणीतील सदस्या माधुरी शहाणे यांनी विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी क्यूआर कोडची संकल्पना काही दिवसांपुर्वी कार्यकारिणीच्या सभेत मांडली होती. असे करतानाच दृकश्राव्य आशयाशी पाठ्यपुस्तकांना जोडून स्वाध्याय, सराव चाचण्या असे काही पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी ई-सामग्री तयार करून ती क्यूआर कोडशी जोडण्यात यावी अशा सूचनाही शहाने यांनी दिल्या होत्या. या कल्पनेवर विचार करता, ती उपयुक्त ठरेल असा विश्वास वाटल्याने ती मंजूर करण्यात आली. 

कसा होणार उपयोग?
चौकोनातील काळ्या-पांढऱ्या रंगातील क्यूआर कोडमध्ये एकत्रित केल्या गेलेल्या वेबलिंक्स आणि अन्य सूचना स्मार्ट फोनच्या कॅमेऱ्याच्या मदतीने वाचता येतात. यामुळे पुस्तकातील धडे आणि त्यांच्याशी संबंधित इतर माहिती ही पुस्तकाव्यतिरिक्त डिजिटल बोर्ड किंवा लॅपटॉप अशा माध्यमांतून अभ्यासता येऊ शकते. यापद्धतीने अध्ययन करता येणार आहे. 

या पद्धतीने पहिली ते बारावीपर्यंतच्या सर्व पुस्तकांची सामग्री क्यूआर कोडने जोडली जाणार असून, येत्या शैक्षणिक वर्षापासून ही पद्धती अंमलात आणली जाण्याची शक्यता आहे. यानुसार क्यूआर कोडच्या साहाय्याने पाठ्यपुस्तकातील प्रकरणांशी संबंधित इतर माहिती काही व्हिडिओ, नकाशे, ई-सामग्री उपलब्ध करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याची माहिती ‘एनसीईआरटी’कडून देण्यात आली आहे. 

(‘बालभारती’ने यंदा प्रकाशित केलेल्या दहावी इयत्तेच्या नव्या तंत्रज्ञानावर आधारित पुस्तकांबद्दल वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Sujata joseph About 272 Days ago
With this, pl also take note that the research has shown connection between blue light emitted by digital screens and led lights harm the mitichondria and brings chronic deceases to people. Using blue light filter glasses or recommending protective screens would be a good solution.
0
0

Select Language
Share Link
 
Search