Next
वृक्ष लागवड चळवळ अंतिम टप्प्यात
महिन्याभरात ११ कोटी ८८ लाख वृक्षांची लागवड
BOI
Thursday, July 26 | 10:42 AM
15 0 0
Share this story


महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्याबरोबरच हरित बनवण्याचा ध्यास घेत राज्यभरात १३ कोटी वृक्षांची लागवड करण्याचा संकल्प सरकारच्या वतीने साधारण महिन्याभरापूर्वी करण्यात आला होता. त्यानुसार सुरू झालेली ही चळवळ आता लोकचळवळीत रूपांतरित झाली असून, या उपक्रमात आत्तापर्यंत तब्बल ११ कोटी ८८ लाख २९ हजार ७८ इतक्या वृक्षांची लागवड करण्यात आली असल्याची माहिती राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. 

या वर्षी एक जुलै ते ३१ जुलै या कालावधीत हे १३ कोटी वृक्ष लावण्याचा संकल्प करण्यात आला होता. त्यापैकी आत्तापर्यंत म्हणजेच २५ जुलैपर्यंत राज्यात ११ कोटींपेक्षा अधिक वृक्ष लावले गेले असल्याची माहिती देण्यात आली आहे. यामध्ये वन आणि वनेतर अशा दोन्हीही क्षेत्रांच्या अंतर्गत झाडे लावण्यात आली. याशिवाय माय प्लांट ॲप, रोपे आपल्या दारी कार्यक्रम, हॅलो फॉरेस्ट १९२६ यांसारख्या विविध उपक्रमांमार्फतही वृक्ष लागवड करण्यात आली. यासंबंधीची अधिकृत आकडेवारी वनविभागामार्फत जाहीर करण्यात आली आहे. 

झालेल्या एकूण वृक्षलागवडीत २८ लाख ५८ हजार २७६ वृक्षस्नेहींनी सहभाग नोंदवला, तर एक लाख ४५ हजार ६८३ स्थळांवर ही वृक्ष लावण्यात आली आहेत. वृक्षलागवडीमध्ये वन विभागाने सहा कोटी ८७ लाख ३८ हजार ८८३, वनेतर क्षेत्रांत चार कोटी १४ लाख ४७ हजार १९३, माय प्लांट ॲपद्वारे दोन लाख ३९ हजार ६१०, रोपे आपल्या दारी कार्यक्रमातून २ लाख ४९ हजार ३७६, हॅलो फॉरेस्ट १९२६ द्वारे ९७७० वृक्षलागवडीची ऑनलाइन पद्धतीने नोंद झाली आहे तर ऑफलाइन पद्धतीने ८१ लाख ४४ हजार २४६ रोपांची नोंद वन विभागाकडे देण्यात आली आहे.

राज्यात सर्वाधिक लागवड नांदेड जिल्ह्यात झाली असून ती ७१ लाख ९२ हजार ८९३ इतकी आहे. त्यानंतर नाशिक जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर आहे. नाशिकमध्ये ६७ लाख १७ हजार १६३ रोपे लावण्यात आली आहेत. तिसऱ्या क्रमांकावर यवतमाळ असून, तिथे ६२ लाख ७१ हजार ७३८ वृक्ष लागवड झाली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात ५९ लाख ५२ हजार ५५८, गडचिरोली जिल्ह्यात ५१ लाख ९० हजार ७१७ वृक्ष लागवड झाली आहे. उस्मानाबाद, अहमदनगर, नंदुरबार, औरंगाबाद जिल्ह्यांमध्ये ४० लाखांहून अधिक वृक्ष लागवड झाली आहे.

महिन्याभरापूर्वी करण्यात आलेल्या संकल्पानुसार राज्यात १३ कोटी वृक्ष लागवडीपैकी १२ कोटीच्या आसपास वृक्ष लागवड झाली असून, हा संकल्प पूर्णत्वाच्या दिशेने जात आहे. ३१ जुलै २०१८पर्यंत राज्यात केलेल्या संकल्पापेक्षाही अधिक रोपांची लागवड होईल, असा विश्वास मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे. 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Harshawardhan Borhade About 175 Days ago
छानच....
0
0

Select Language
Share Link