Next
मुंबई विमानतळ देशातील ‘सर्वोत्तम इन्फ्रास्ट्रक्चर’
BOI
Wednesday, February 20, 2019 | 03:44 PM
15 0 0
Share this story


मुंबई : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहराचा आर्थिक आणि पर्यायी वाहतुक व्याप प्रचंड मोठा आहे. हे लक्षात घेऊन ‘छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळा’वर उभारण्यात आलेले नवीन टर्मिनल (टी २) हे देशातील सर्वोत्तम पायाभूत सुविधा (इन्फ्रास्ट्रक्चर) असलेले ठरले आहे. यासाठीचा ‘ईपीएस वर्ल्ड’ हा या क्षेत्रातला पुरस्कार नुकताच विमानतळाला मिळाला आहे. 

फेब्रुवारी २०१४मध्ये मुंबई विमानतळावर ही नवीन टर्मिनल इमारत उभारण्यात आली होती. चार लाख ५० हजार चौरस मीटर इतक्या क्षेत्रफळावर ही इमारत उभारण्यात आली. चार कोटी प्रवासी क्षमतेचे हे टर्मिनल असून याठिकाणी १२ हजार कर्मचारी काम करतात. एअर इंडिया, एअर विस्तारा, जेट एअरवेज यांसारख्या भारतीय विमानसेवा कंपन्यांबरोबरच इतर परदेशी कंपन्यांची विमानेही या टर्मिनलमधूनच उडान करतात. अशा प्रकारे सर्व प्रकारच्या सुविधांचा विचार करून बांधण्यात आलेले हे नवीन टर्मिनल विविध सार्वजनिक उपयोगांच्या प्रकल्पामधील देशातील सर्वोत्तम बांधकाम ठरले आहे. नवी दिल्लीत नुकत्याच झालेल्या ‘ईपीएस वर्ल्ड’ या परिषदेत विमानतळाला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. 

‘छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ’ हा आशियातील १४वा आणि जगातील २९वा सर्वांत व्यग्र असा विमानतळ आहे. या विमानतळावरून तासाला सरासरी ४८ विमानांची ये-जा होते. असे असताना या विमानतळाचा विशिष्ट पद्धतीने विकास होणे आवश्यक होते. दरम्यान हा विकास खासगाकरणातून शक्य होईल हा विचार करून विमानतळ प्राधिकरणाची ‘मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड (मिआल)’ आणि ‘जीव्हीके’ यांची मिळून एकत्रित करण्यात आलेल्या संयुक्त कंपनीकडे हे काम सोपवण्यात आले. सध्या हीच कंपनी विमानतळाचे दैनंदिन काम पाहते. 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link