Next
‘जिज्ञासा’तर्फे साहित्य अभिवाचन स्पर्धा उत्साहात
BOI
Tuesday, February 06, 2018 | 02:32 PM
15 0 0
Share this article:

रत्नागिरी : गेली ३२ वर्षे सांस्कृतिक क्षेत्रात सातत्याने नवनवीन उपक्रम राबविणाऱ्या येथील जिज्ञासा थिएटर्सतर्फे  नुकतेच अ. भा. साहित्य अभिवाचन स्पर्धेचे आयोजन देसाई हायस्कूल येथे आयोजित करण्यात आले. रंगगंध (चाळीसगाव) आणि जिज्ञासा थिएटर्स यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या या स्पर्धेत रत्नागिरीसह वेंगुर्ला, लांजा, मंडणगड व दापोली येथील संघ सहभागी झाले होते. स्पर्धेची अंतिम फेरी २३ ते २५ फेब्रुवारीदरम्यान चाळीसगाव येथे होईल.

स्पर्धेचे उद्घाटन परीक्षक गजानन पळसुले देसाई यांच्या उपस्थितीत झाले. कार्यक्रमाचे अध्यक्षपद प्रशालेचे शिक्षक संतोष गार्डी यांनी भूषविले. ‘जिज्ञासा’चे अध्यक्ष सुहास भोळे, उपाध्यक्ष जादुगार विनयराज, परीक्षक ज्योती मुळ्ये आदी मान्यवर उपस्थित होते.

या स्पर्धेत रत्नागिरीतील कलारंग संस्थेने प्रथम क्रमांक पटकावून अंतिम फेरीत स्थान मिळवले. द्वितीय क्रमांक कला वाणिज्य विज्ञान महाविद्यायल (लांजा) यांनी, तर तृतीय क्रमांक किरात ट्रस्ट (वेंगुर्ला) यांनी पटकावला. प्रथम क्रमांकाचा एकच संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरला.

वाचिक अभिनयाची पारितोषिके अनुक्रमे स्वानंद देसाई (कलारंग, रत्नागिरी), अपूर्वा कामत (लांजा कॉलेज), सीमा मराठे (किरात ट्रस्ट, वेंगुर्ला), सानिका वाडेकर (अ. के. देसाई हायस्कूल, रत्नागिरी) यांनी पटकावली.

सूत्रसंचालन स्वानंद देसाई यांनी केले. स्पर्धक संस्थेतील कलावंत, प्रशालेतील विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि सुजाण रसिक या वेळी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सुहास भोळे, विनयराज उपरकर यांच्यासह आकांक्षा भोळे, श्री. मणियार, ज्योती मुळ्ये, संतोष गार्डी, शशिकांत लाखण, देवव्रत पवार, स्वानंद देसाई, विश्वनाथ गावडे, शुभम शिर्के आदींनी विशेष मेहनत घेतली.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search