Next
‘कला, साहित्य आण‍ि वैचार‍िक क्षेत्रांतील महान व्यक्त‍िमत्त्वाचा अस्त’
देवेंद्र फडणवीस यांनी वाहिली गिरीश कार्नाड यांना श्रद्धांजली
BOI
Monday, June 10, 2019 | 03:03 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : ‘नामवंत अभिनेते-दिग्दर्शक गिरीश कार्नाड यांच्या निधनाने साहित्य, कला आणि वैचारिक क्षेत्रांतील एक महान व्यक्तिमत्त्व आपण गमावले आहे,’ अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गिरीश कार्नाड यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणाले, ‘कार्नाड हे एक बहुपेडी व्यक्तिमत्त्व होते. साहित्य, चित्रपट, रंगभूमी यांसह वैचारिक क्षेत्रांतही त्यांचा समर्थ वावर होता. विशेषत: एक महान रंगकर्मी म्हणून त्यांचे भारतीय नाट्यक्षेत्रातील योगदान सदैव स्मरणीय असेल. ज्ञानपीठ, कालिदास सन्मान, साहित्य अकादमी, संगीत अकादमी यांच्यासह विविध प्रतिष्ठेचे पुरस्कार व नागरी सन्मानांनी झालेला गौरव हा त्यांच्या कार्याचे महत्त्व विशद करणारा आहे. ययाति, तुघलक, नागमंडल, हयवदन यांसारखी नाटके आण‍ि उत्सव या चित्रपटाचे दिग्दर्शक म्हणून त्यांची विशेष ओळख होती. भारतीय पौराणिक कथांना समकालीन प्रश्नांशी जोडत त्यावर भाष्य करणारे त्यांचे लेखन केवळ समाजाच्या डोळ्यात अंजन घालणारे नव्हते, तर ते विचार प्रवाहित करणारे होते. भारतीय नाट्यक्षेत्राची पुनर्रचना करणाऱ्यांमध्ये ते अग्रणी होते. ऑक्सफर्डसारख्या नामांकित विद्यापीठाचे स्कॉलर असलेल्या कार्नाड यांचा विविध सामाजिक विषयांचा मोठा अभ्यास होता.’

‘माथेरान येथे जन्मलेल्या कार्नाड यांचा महाराष्ट्राशी अनोखा ऋणानुबंध असल्याने मराठी चित्रपटसृष्टी-रंगभूमी, तसेच साहित्य क्षेत्राशीही त्यांचा निकटचा संबंध होता. जब्बार पटेल दिग्दर्शित उंबरठा चित्रपटातील त्यांची भूमिका रसिकांच्या सदैव स्मरणात राहील,’ असे मुख्यमंत्र्यांनी शोकसंदेशात सांगितले.

(गिरीश कार्नाड यांच्या कामगिरीचा थोडक्यात आढावा घेणारा ‘बाइट्स ऑफ इंडिया’वरील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search