Next
आता प्रत्येक मतदारसंघात ‘सखी मतदान केंद्र’
प्रेस रिलीज
Wednesday, March 27, 2019 | 05:37 PM
15 0 0
Share this article:

संग्रहित फोटो

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकांसाठी प्रत्येक लोकसभा मतदारसंघात ‘महिला व्यवस्थापित मतदान केंद्र’ निर्माण  करण्यात येणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने तसे आदेश दिले असून, याची अंमलबजावणी महाराष्ट्रात करण्यात येणार आहे. या मतदान केंद्रांमध्ये तैनात असलेल्या पोलिसांपासून ते निवडणूक कार्यावर असलेल्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासह सर्वच जण महिला असतील. सर्व महिला व्यवस्थापित मतदान केंद्रे ‘सखी मतदान केंद्र’ म्हणून ओळखली जाणार आहेत.

लैंगिक समानता आणि मतदार प्रक्रियेत महिलांच्या अधिक रचनात्मक सहभागासंबंधातील वचनबद्धतेचा भाग म्हणून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महिलांनी चालविलेले महिला मतदान केंद्र असणार आहे.

सर्व महिला व्यवस्थापित मतदान केंद्रात कोणताही विशिष्ट रंग वापरला जाणार नाही; तसेच मतदान केंद्रातील कुठल्याही खास राजकीय पक्षाच्या रंगाचा अनावश्यक वापर टाळण्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट निर्देश दिले आहेत. सखी मतदान केंद्रात तैनात असलेल्या महिला त्यांच्या आवडीच्या कोणत्याही रंगाचा पोशाख परिधान करू शकतात. हे केंद्र अधिकाधिक आर्कषक आणि सुंदर बनविण्यासाठी रांगोळी, रंगरंगोटीसह येथील साफसफाईवर विशेष भर देण्यात येणार आहे.

यंदाच्या निवडणुकीत महिला शक्ती निर्णायक ठरणार आहे. २०१४च्या तुलनेमध्ये महिला मतदारांचा टक्का ८८ ९वरून ९११ असा वाढला आहे. २००९ आणि २०१४या दोन्ही लोकसभा निवडणुकीसाठी केलेल्या मतदार नोंदणीमध्ये महिला मतदारांची संख्या पुरुष मतदारांपेक्षा कमी होती; मात्र २०१९च्या लोकसभा निवडणुकीसाठी करण्यात आलेल्या मतदार नोंदणीत महिला मतदारांची संख्या वाढली आहे. २०११च्या जनगणनेनुसार एक हजार पुरुषांमागे ९२५महिला असे प्रमाण होते. २०१४मध्ये मतदार यादीतील महिलांचे प्रमाण एक हजार पुरुषांमागे ८८९ इतके होते. आता मात्र २०१९मध्ये एक हजार पुरुषांमागे ९११ अशी लक्षणीय सुधारणा झाली आहे.

‘सखी मतदार केंद्र’ स्थापन करण्याच्या निर्णयामुळे महिलांचा मतदानातील सहभाग वाढण्यास मदत होणार आहे. या मतदार केंद्रावर अधिकारी, कर्मचारी महिला असतील. प्रत्येक मतदारसंघातून एकाच मतदान केंद्राची निवड होईल. महिला मतदान केंद्र निवडताना केंद्राची सुरक्षितता लक्षात घेतली जाणार आहे. संवेदनशील केंद्र टाळून तहसील कार्यालय, पोलीस स्टेशननजीकच्या केंद्रांची; तसेच ज्या मतदान केंद्रांवर निवडणूक प्रक्रियेतील अधिकाऱ्यांचा कायम संपर्क राहील, अशा केंद्राची या विशेष प्रयोगासाठी निवड करण्यात येणार आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search