Next
‘सिंहगड इन्स्टिट्यूट’तर्फे राष्ट्रीय चर्चासत्र
प्रेस रिलीज
Saturday, January 12, 2019 | 01:22 PM
15 0 0
Share this article:पुणे : लोणावळा येथील सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल सायन्सेसतर्फे प्राचार्य व शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून १० व ११ जानेवारी २०१९ रोजी राष्ट्रीय चर्चासत्र आयोजित केले होते.

आरोग्य स्वास्थ राहण्यासाठी जीवनात औषधी वनस्पती महत्त्वाची आहे. सजीवासाठी प्राणवायूचे महत्त्व तसेच, वातावरणातील प्रदूषण टाळण्यासाठी वनस्पती महत्त्वाचे कार्य करत असते. समाजात त्यांचे महत्त्व पटवून देण्याच्या उद्देशाने हे चर्चासत्र घेण्यात आले. यात पहिल्या दिवशी ‘औषधी वनस्पतीतील रासायनिक घटकांचा अभ्यास’ या विषयावर डॉ. स्वाती पाटील, डॉ. अभिजित सिंग, विश्वजीत काळे, प्रा. के. एस. लठ्ठा यांची व्याख्याने झाली. दुसऱ्या दिवशी संशोधनासंबंधित पोस्टर प्रदर्शन भरविण्यात आले. यात उत्कृष्ट पोस्टर प्रदर्शन करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रा. लठ्ठा यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.‘दैनंदिन जीवनामध्ये वापरत असलेल्या भाजीपाला, अन्नधान्य, मसाल्याच्या पदार्थांत अतिमहत्त्वाच्या जीवनावश्यक घटक औषधी स्वरूपात समजून घेण्याची आज काळाची गरज आहे,’ असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. राजेश ओसवाल यांनी प्रस्तावना करताना केले.

या कार्यशाळेत राज्यातील व इतर राज्यातील शिक्षकांनी मोठ्या संख्येने सक्रीय सहभाग घेतला. लोणावळा संकुलाचे संकुल संचालक डॉ. एम. एस. गायकवाड यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे नियोजन समन्वयक प्रा. राहुल शिवरकर यांनी केले.

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Khushal Shah About 216 Days ago
Excellent .... Very good
0
0
Jayawant Desai About 217 Days ago
Excellent academic activity
0
0

Select Language
Share Link
 
Search