Next
नाशिक रोड येथे वाहन लोकार्पण सोहळा
शिवशाही युवा फाउंडेशनचा पुढाकार
BOI
Monday, May 27, 2019 | 05:38 PM
15 0 0
Share this article:


नाशिक : धोंगडेनगर प्रणित शिवशाही युवा फाउंडेशनतर्फे सतीश बिऱ्हाडे व पवन उगले यांच्या स्मरणार्थ रुग्ण व ज्येष्ठ नागरिकांसाठी वाहन लोकार्पण सोहळा नुकताच आयोजित केला होता.

नाशिक रोड येथे झालेल्या या कार्यक्रमाला प्रा. यशवंत पाटील, मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राहुल ढिकले, प्रभाग सभापती पंडित आवारे, नगरसेवक रमेश धोंगडे, संगीता गायकवाड, सूर्यकांत लवटे, ज्योती खोले, संयोजक अतुल धोंगडे, राजेश फोकणे, डॉ. विशाल कासलीवाल, बंटी कोरडे, दिनकर पाळदे, रमेश जाधव, मनविसे शहराध्यक्ष शाम गोहाड, शिरीष लवटे, आकाश उगले, शशी चौधरी, नितीन धानापुणे, सतीश बिरारे, बाळासाहेब जाधव, सूर्यभान गायधनी आदींची प्रमुख उपस्थिती होती.

ज्येष्ठांना दवाखाना व अन्य महत्त्वाच्या कामांसाठी तसेच गर्भवती व अन्य गरजूंना हे वाहन मोफत उपलब्ध केले जाणार असल्याची माहिती अतुल धोंगडे यांनी दिली.

सचिन पाटील यांनी सूत्रसंचलन केले. या कार्यक्रमाचे संयोजन मोहन धोंगडे, मच्छिंद्र चव्हाण, नितीन धोंगडे, अमोल धोंगडे, अतुल चव्हाण, गौरव बागुल, गौरव हांडोरे, आदित्य धोंगडे, रितेश चव्हाण, संतोष बिऱ्हाडे, आकाश करोटे, राहुल धांडे, महेश जाचक, मोहन धोंगडे, शिवा धोंगडे, अमन रोकडे, रितेश चव्हाण, हर्षद जोशी आदींनी केले. या कामी योगीराज गजाजन ज्येष्ठ नागरी संघाचे सहकार्य लाभले आहे.

वाहनासाठी संपर्क : शिवा धोंगडे- ९९७०४ ७२८८८. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search