Next
‘टिळक युग’ या विषयावर डॉ. सदानंद मोरे यांचे व्याख्यान
BOI
Thursday, July 25, 2019 | 04:22 PM
15 0 0
Share this article:

लोकमान्य टिळकपुणे : भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य टिळक यांच्या स्मृती शताब्दी वर्षाच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने डॉ. सदानंद मोरे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘टिळक युग’ या विषयावर डॉ. मोरे यांचे व्याख्यान होणार आहे. 

भारतीय असंतोषाचे जनक म्हणून ओळखले जाणारे आणि महाराष्ट्रातील आद्य साहित्य संस्था असलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या स्थापनेत मोलाची भूमिका बजावलेले परिषदेचे प्रेरणास्थान लोकमान्य टिळक यांच्या स्मृती शताब्दीला एक ऑगस्टपासून प्रारंभ होत आहे. त्यानिमित्ताने पूर्वसंध्येला म्हणजेच बुधवार, ३१ जुलैला ‘मसाप’च्या वतीने या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. 

ज्येष्ठ साहित्यिक, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांच्या या व्याख्यानास टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दीपक टिळक प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. ३१ जुलैला सायंकाळी ६.१५ वाजता महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती ‘मसाप’चे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search