Next
कामसिद्ध विद्यालयाचे क्रीडा स्पर्धेत यश
BOI
Monday, September 17, 2018 | 01:11 PM
15 0 0
Share this article:सोलापूर :
मंगळवेढ्यात नुकत्याच झालेल्या कबड्डी स्पर्धेत खुपसंगी (ता. मंगळवेढा, जि. सोलापूर) येथील कामसिद्ध विद्यालयाच्या १४ वर्षे वयोगटाच्या मुलींच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला. त्यामुळे हा संघ जिल्हा पातळीवरील स्पर्धेसाठी पात्र ठरला. या विद्यालयाची कबड्डीतील विजयाची परंपरा या संघाने कायम राखल्याने त्यांचे विशेष कौतुक करून पुढील कामगिरीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच अन्य विविध खेळांतही या शाळेच्या संघांनी नेत्रदीपक कामगिरी केली.

तायक्वांदो स्पर्धेत सहावीमधील महेश सुरवसे याने तालुका स्तरावर ३५ किलो वजनी गटात प्रथम क्रमांक मिळवला. त्यामुळे त्याची जिल्हा पातळीवरील स्पर्धेसाठी निवड झाली. मंगळवेढा येथील इंग्लिश स्कूलच्या आखाड्यात पार पडलेल्या तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेमध्ये १७ वर्षे वयोगटातील ६५ किलो वजनी गटात दहावीमधील मारुती भगवान मरिआईवाले याने चमकदार कामगिरी करून तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवल्याने त्याचीही जिल्हा पातळीवरील स्पर्धेसाठी निवड झाली. १४ वर्षे वयोगटात ३५ किलो वजनी गटात सातवीमधील प्रकाश संभाजी मरिआईवाले याने आणि आठवीमधील दीपक भगवान मरिआईवाले याने ४१ किलो वजनी गटात द्वितीय क्रमांक मिळविला. 

क्रीडा शिक्षक विठ्ठल बिले आणि आबासाहेब कारंडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले होते. प्रशालेच्या यशाबद्दल जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. तारळकर, तालुका क्रीडा अधिकारी अमोघसिद्ध सोलनकर, गटशिक्षणाधिकारी एच. टी. कोष्टी, संस्थेचे अध्यक्ष विनायक गडदे, शालेय समितीचे चेअरमन भीमराव मोरे, संस्थेचे उपाध्यक्ष तानाजी चौगुले, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सदाशिव पांढरे, संस्थेचे खजिनदार हर्षराज बिले, संस्थेचे सचिव यशवंत माळी, संचालक बंडू चौगुले, अण्णासो वाले, महादेव माळी, खर्शीद काझी, प्रशालेचे मुख्याध्यापक तुकाराम मेटकरी, पर्यवेक्षक प्रकाश आवताडे, सर्व कर्मचारी, तसेच खुपसंगी आणि पाठखळ ग्रामस्थांनी अभिनंदन केले. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search