Next
‘द स्टोलन प्रिन्सेस’ लवकरच प्रदर्शित होणार
Press Release
Thursday, August 09, 2018 | 04:35 PM
15 0 0
Share this story

मुंबई : खिळवून ठेवणाऱ्या साहसांनी भरलेली एक आकर्षक परीकथा, विस्मयकारक व्यक्तिरेखा आणि रोचक उपकथानकांनी यांनी युक्त असा ‘द स्टोलन प्रिन्सेस’ हा एक कुटुंबप्रधान अॅनिमेशनपट आहे. हा जादूई, साहसी, कुटुंबप्रधान अॅनिमेशनपट २४ ऑगस्ट रोजी भारतभरात इंग्रजी, हिंदी, तमीळ आणि तेलुगू भाषांत प्रदर्शित होणार आहे.

लहान मुले, टीनएजर्स आणि तरुण या सर्वांना रस वाटेल अशा पद्धतीने फिल्म तयार करण्यात आली आहे. कथेचे बहुअंगी स्वरूप आणि भुरळ घालणारी दृश्ये यामुळे संपूर्ण कुटुंबासाठी ही फिल्म रोचक ठरेल. या अॅनिमेशनपटाचे सादरीकरण आणि वितरण अल्ट्रा मीडिया अॅंड एंटरटेन्मेंट समूहाने केले आहे.

ओलेग मालामुझ यांनी दिग्दर्शित केलेल्या या अॅनिमेशनपटाची अप्रतिम कथा घडते ती शूर सैनिक, सुंदर राजकन्या आणि एकमेकांशी संघर्ष करणाऱ्या चेटक्यांच्या युगात. सैनिक होण्याचे स्वप्न बाळगलेला रुसलान नावाचा एक भटक्या कलावंत देखण्या मिलाला भेटतो आणि तिच्या प्रेमात पडतो. ती राजाची कन्या आहे अशी शंकाही त्याच्या मनात येत नाही. अर्थात, या प्रेमिकांचा आनंद फार काळ टिकणार नसतो. चोर्नोमोर नावाचा एक दुष्ट जादूगार एका मायावी वावटळीच्या रूपाने येतो आणि मिलाची प्रेम करण्याची शक्ती आपल्या जादूटोण्याच्या शक्तीमध्ये रूपांतरित करण्यासाठी तिला रुसलानच्या डोळ्यासमोरून चोरून नेतो. सर्व अडथळ्यांवर मात करण्यासाठी आणि खरे प्रेम हे जादूटोण्याहून बलशाली आहे हे सिद्ध करण्यासाठी रुसलान अजिबात वेळ न घालवता चोरीला गेलेल्या राजकन्येचा शोध घेणे सुरू करतो, अशा प्रकारचे हे कथानक आहे.

(Please click here to read this news in English.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link