Next
अपोलो क्लिनिकतर्फे पहिल्या ‘सोसायटी क्लिनिक’ची स्थापना
पुण्यात येत्या तीन वर्षात ७५ सोसायटी क्लिनिक सुरू करणार
BOI
Saturday, March 30, 2019 | 05:54 PM
15 0 0
Share this article:

पुणे : आता शहरातील ५००हून अधिक घरे असलेल्या निवासी संकुलांमध्ये त्यांच्या दारातच उत्तम दर्जाची वैद्यकीय सुविधा उपलब्ध होणार आहे. अपोलो क्लिनिकने देशात प्रथमच ‘सोसायटी क्लिनिक’ ही अभिनव संकल्पना दाखल केली आहे. ‘अपना कॉम्प्लेक्स’ या अपार्टमेंट व्यवस्थापन आणि सुरक्षा व्यवस्था पुरविणाऱ्या कंपनीबरोबर भागीदारी करून अपोलो क्लिनिकने पुण्यासह चेन्नई, हैद्राबाद, बेंगळूरूमध्ये या सेवेची सुरुवात केली आहे. येत्या तीन वर्षात आणखी आठ शहरांमध्ये याचा विस्तार करून, ५०० सोसायटी क्लिनिक्स सुरू करण्याची कंपनीची योजना आहे.

निवासी संकुलांच्या आवारातच ही क्लिनिक्स असतील. तिथे आरोग्य तपासणी, वैद्यकीय सल्ला, रक्त तपासणी, रक्तदाब, वजन, उंची आदी तपासणी, लसीकरण, नेब्युलायझेशन, लहान जखमांवरील उपचार, इंजेक्शन्स देणे यासह जीव वाचवण्यासाठीचे प्राथमिक उपचार सुविधा आदी सेवा उपलब्ध असतील.

मोठ्या शहरांमध्ये वेळेत आणि तत्काळ वैद्यकीय सेवा मिळणे कठीण होत असल्याने, त्यावर उपाय म्हणून अपोलो क्लिनिकने ही अभिनव उपाययोजना राबवली आहे.

अपोलो क्लिनिक आणि अपना कॉम्प्लेक्सच्या भागीदारीबाबत बोलताना अपोलो क्लिनिकचे श्री. आनंद म्हणाले, ‘दर्जेदार वैद्यकीय सेवा मिळणे हा प्रत्येक व्यक्तीचा मूलभूत हक्क आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आरोग्य सेवा सहज उपलब्ध करण्यासाठी ‘अपोलो’ कटीबद्ध आहे. नागरिकांना दर्जेदार वैद्यकिय सेवा सहज उपलब्ध व्हाव्यात यासाठी आम्ही ‘अपना कॉम्प्लेक्स’शी भागीदारी केली आहे. यासाठी एक अॅप तयार करण्यात आले आहे. प्रत्येक महानगरामध्ये ५०० पेक्षा जास्त घरे असणारी १५० पेक्षा जास्त निवासी संकुले असतील, असे गृहीत धरल्यास या अनोख्या सेवेला चांगली मागणी मिळेल, अशी मला खात्री वाटते.’ 

या सेवेबद्दल बोलताना ‘अपना कॉम्प्लेक्स’चे सीबीओ अमित त्यागी म्हणाले, ‘‘सोसायटी क्लिनिक’ सारखी अभिनव सेवा दाखल करण्यासाठी अपोलो क्लिनिकसोबत भागीदारी केल्याचा आम्हाला आनंद आहे. निवासी संकुलांमधील रहिवाशांना अगदी सहजपणे अपोलो क्लिनिकच्या सेवांचा लाभ घेता यावा याकरता आम्ही ‘अपना कॉम्प्लेक्स अॅप’ दाखल केले आहे. आम्ही फक्त उपचारांवर नाही, तर प्रतिबंधात्मक उपचार आणि आरोग्यदायी जीवनशैलीवरही भर देता आहोत. या अॅपद्वारे लोकांना अपोलोच्या तज्ज्ञ डॉक्टरांकडून आरोग्याचे मंत्र आणि सल्लेही मिळतील. अपोलोचे वैद्यकीयतज्ञ ऑनलाइन; तसेच घरी रुग्ण तपासणीसाठीही उपलब्ध असतील.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search