Next
भादाणे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी उर्मिला भालेकर
BOI
Wednesday, January 09, 2019 | 05:23 PM
15 0 0
Share this story



भिवंडी : राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या व पाच गावांमध्ये विस्तार असलेल्या भादाणे ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शिवसेनेच्या उर्मिला रमेश भालेकर यांची आठ जानेवारी २०१९ रोजी बिनविरोध निवड करण्यात आली.

विद्यमान सरपंच सुरेखा कथोरे यांनी ठरल्याप्रमाणे राजीनामा दिल्याने हे पद रिक्त होते. त्यानुसार आठ जानेवारीला निवडणूक अधिकारी एस. व्ही. भास्कर यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा बोलविण्यात आली होती. या वेळी सरपंचपदासाठी दिलेल्या वेळेत उर्मिला भालेकर यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने दुपारी दोन वाजता निवडणूक अधिकारी भास्कर यांनी त्यांची भादाणे ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले.

भालेकर यांची निवड होताच समर्थकांनी फटाक्यांच्या आतिषबाजी वाजतगाजत त्यांची मिरवणूक काढली. पंचायत समितीचे माजी उपसभापती व शिवसेनेचे विद्यमान सदस्य प्रकाश भोईर, शिवसेना संपर्कप्रमुख विष्णू चंदे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक डॉ. संजय पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राकेश पाटील, उद्योजक सुभाष कथोरे, रवींद्र विशे, संतोष राऊत, उपसरपंच जयेश जाधव, ग्रामपंचायत सदस्य विकास थेटे, प्रदीप भोईर, सुनीता कथोरे, सरिता राऊत, अरुण गवते, ग्रामसेवक व्ही. के. जाधव यांनी त्यांचे अभिनंदन केले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link