Next
‘अन्नपूर्णा’चा वार्षिक सभासद मेळावा उत्साहात
प्रेस रिलीज
Friday, February 01, 2019 | 11:32 AM
15 0 0
Share this storyपुणे : अन्नपूर्णा परिवारातर्फे कर्वे नगर येथील पंडित फार्ममध्ये सभासदांचा २६वा वार्षिक मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याचे औचित्य साधून सुभद्रा सूर्यवंशी, रेखा कांबळे यांसह अनेक उद्योजिकांना अन्नपूर्णा परिवाराने ‘उत्कृष्ट उद्योजिका’ म्हणून सन्मानित  केले.

‘अन्नपूर्णा’ ही पुणे व मुंबईतील वस्तींमध्ये सक्रीय असणारी व महिला सक्षमीकरणावर काम करणारी संस्था आहे. या मेळाव्याला पुण्याच्या वस्तीतील आठ हजारांहून अधिक महिला सहभागी होत्या. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या आणि महिला सर्वांगीण उत्कर्ष मंडळाच्या सह-संस्थापक मनीषा गुप्ते, इंडियन ओव्हरसीज बँकचे सहाय्यक जनरल मॅनेजर थॉमस मिरांडा, ‘अन्नपूर्णा’च्या संस्थापक अध्यक्षा डॉ. मेधा सामंत-पुरव उपस्थित होत्या.

‘अन्नपूर्णा’ने २०१८मध्ये २०० कोटी रुपयांचे कर्जवाटप केले असून, महिलांना विनातारण देण्यात आले आहे. या कर्जाचा परतफेड दर हा १०० टक्के आहे. त्याचप्रमाणे ‘अन्नपूर्णा’तर्फे बचतीवर उत्कृष्ट व्याजदर दिला जातो. या वर्षी बचतीची रक्कम ६० कोटींवर गेल्याची माहिती या वेळी देण्यात आली.

सन्मानित करण्यात आलेल्या उद्योजिकांसह अन्नपूर्णा परिवाराच्या डॉ. मेधा सामंत-पुरव

या वेळी बोलताना डॉ. मेधा सामंत-पुरव म्हणाल्या, ‘या वर्षी आम्ही सर्व महिलांना कॅशलेस सेवा पुरवल्या आहेत. त्यासाठी सर्व महिलांचे बँक खाते आम्ही उघडले आहे. कर्जाची रक्कम वाढवून तीस हजार ते दोन लाख एवढी विनातारण दिली जाणार असून, आरोग्य विमा एक हजार ७०० ते ३० हजार एवढ्या रक्कमेपर्यंत दिला जाणार आहे.’

सभासादांना १२ टक्के लाभांश, विद्यमान व जुने सदस्य, जे नोटाबंदीमध्ये अडचणीत आले त्यांना उच्च कर्जाचा स्लॅब किमान ३० हजार रुपये ते जास्तीत जास्त पाच लाखांपर्यंत जाहीर, मुदत ठेव, आवर्ती ठेव या योजनांमध्ये व्याजदर हा एक वर्षासाठी १० टक्के, दोन वर्षांसाठी ११ टक्के, तर तीन वर्षांसाठी १२ टक्के असा असेल, आर्थिक सहाय्यच्या रकमेत वाढ, ‘अन्नपूर्णा’च्या सदस्यांच्या कुटुंबातील एका सदस्याला प्रति वर्ष ५७५ रुपयांचे प्रतिबंधात्मक आरोग्य तपासणी पॅकेज अशा महत्त्वाच्या घोषणा या वेळी करण्यात आल्या.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link