Next
सीए इन्स्टिट्यूटतर्फे एकदिवसीय कार्यशाळेला प्रतिसाद
BOI
Monday, March 25, 2019 | 05:48 PM
15 0 0
Share this article:

सीए इन्स्टिट्यूटच्या रत्नागिरी शाखेतर्फे आयोजित कार्यशाळेत सीए महेश्‍वर मराठे यांचे स्वागत करताना अध्यक्ष सीए अँथनी राजशेखर. डावीकडून प्रसाद आचरेकर, आनंद पंडित, बिपीन शहा.

रत्नागिरी : सीए इन्स्टिट्यूटच्या येथील शाखेतर्फे एकदिवसीय कार्यशाळेचे नुकतेच आयोजन करण्यात आले. यामध्ये जिल्ह्यातील ५० चार्टर्ड अकाउंटंट (सीए) सहभागी झाले होते.

सीए इन्स्टिट्यूटच्या रत्नागिरी शाखेचे नूतन अध्यक्ष सीए अँथनी राजशेखर यांनी शाखेच्या नवीन कार्यकारिणीची ओळख करून दिली. तसेच या वर्षामध्ये शाखेतर्फे घेण्यात येणार्‍या नवनवीन उपक्रमांची माहिती दिली.

प्

रथम सत्रात सीए महेश्‍वर मराठे यांनी बँक ऑडिटसंदर्भात प्राधान्य क्षेत्रातील कर्जवाटपाचे परीक्षण व बँकिंग क्षेत्रातील अनियमितता यावर सखोल विवेचन केले. लेखापरीक्षकांनी बँक ऑडिट करताना घ्यावयाची काळजी याबद्दल त्यांनी मार्गदर्शन केले. दुसर्‍या सत्रात सीए मंगेश किनरे यांनी अनरेग्युलेटेड डिपॉझिट ऑर्डिनन्स यावर मार्गदर्शन केले; तसेच अनुत्पादित कर्जांचे वर्गीकरण व त्यासंदर्भातील नियम यावर शेवटच्या सत्रात त्यांनी सर्व सीएंसमवेत चर्चा केली.

या प्रसंगी सीए इन्स्टिट्यूटच्या रत्नागिरी शाखेचे अध्यक्ष अँथनी राजशेखर, उपाध्यक्ष बिपीन शहा, सचिव आनंद पंडित, विकासा चेअरमन सीए प्रसाद आचरेकर व्यासपीठावर उपस्थित होते. सीए अक्षय जोशी यांनी सूत्रसंचालन केले. सीए आचरेकर यांनी आभार मानले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search