Next
पालक आणि शिक्षकांसाठी मोफत मार्गदर्शन कार्यक्रम
BOI
Friday, January 18, 2019 | 04:38 PM
15 0 0
Share this story

पुणे : सातवी ते दहावी हा काळ मुलांच्या शैक्षणिक प्रवासातील महत्त्वाचा काळ असतो. या काळात मुलांनाच नाही, तर पालक आणि शिक्षकांनाही जागरुक राहावे लागते. हे लक्षात घेऊन येथील ‘गुरूमंत्र एज्युकेशन ट्रस्ट’तर्फे रविवार, २० जानेवारीला सातवी ते दहावीत मुले असलेल्या पालकांसाठी आणि शिक्षकांसाठी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 

रविवारी (२० जानेवारी) सायंकाळी साडे पाच वाजता कोथरुडमधील परांजपे शाळेच्या सभागृहात हा कार्यक्रम होईल. कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य असेल. महाराष्ट्र एस. एस. सी. बोर्ड, पुणे येथील सहायक सचिव अनिल गुंजाळ हे या मार्गदर्शन कार्यक्रमातील प्रमुख वक्ते असणार आहेत. याव्यतिरिक्त प्रख्यात मनोविकारतज्ज्ञ डॉ. स्वाती जोशी यादेखील या कार्यक्रमात निमंत्रित असून त्या किशोरवयीन मुलांशी आणि त्यांच्या पालकांशी संवाद साधतील.  

पुढील शैक्षणिक प्रवासाच्या दृष्टीने तसेच स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने १०वीचे महत्त्व, अभ्यासाव्यतिरिक्तचे वाचन, संगणकाचा वापर, अभ्यास, खेळ व छंद यांना देण्यात येणाऱ्या वेळेचे व्यवस्थापन, दहावीनंतर शाखानिवडीबाबतचे निर्णय, ‘आयआयटी’सारख्या परीक्षांसाठीची तयारी कधीपासून करावी या आणि अशा अनेक विषयांवर आधारित चर्चेची सत्रे या वेळी घेण्यात येतील. त्यानंतर प्रश्नोत्तरांसाठीही वेळ देण्यात येणार आहे. 

तारीख व वेळ : रविवार, २० जानेवारी, सायंकाळी ५.३०वाजता
स्थळ : परांजपे शाळा सभागृह, कर्वे पुतळ्याजवळ, कोथरुड
अधिक संपर्कासाठी
अमित देवदास : ७५१७४ ४०२६५, ७७१९८ ०३११९ 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link