Next
डेक्कन कॉलेजमध्ये ‘संशोधन पद्धती’वर अभ्यासक्रम
BOI
Thursday, July 11, 2019 | 03:41 PM
15 0 0
Share this article:


पुणे : संशोधन करताना येणार्‍या अनेक अडचणी सोडवण्यासाठी पुण्यातील डेक्कन कॉलेज पोस्ट ग्रॅज्युएट अ‍ॅंड रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये संशोधन पद्धती (रिसर्च मेथडॉलॉजी) हा सहा महिन्यांचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम आयोजित करण्यात आला आहे. या वर्षीच्या अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.

अभ्यासक्रमाचे हे नववे वर्ष असून, तो जुलै ते डिसेंबर या कालावधीत असणार आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांवर आधारित असणार्‍या या अभ्यासक्रमाचा लाभ राज्यातील सर्व विद्यापीठांमधील पदव्युत्तर विद्यार्थी-विद्यार्थिनी घेऊ शकतात. यात आपण करत असणार्‍या संशोधनाला दिशा देण्यासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन, तसेच चर्चा घडवल्या जातात. अभ्यासक्रमाच्या शेवटी लेखी परिक्षा आणि प्रकल्प सादरीकरण याच्या मुल्यांकनानंतर प्रमाणपत्र दिले जात असल्याची माहिती अभ्यासक्रमाच्या समन्वयक डॉ. प्रज्ञा कुलकर्णी यांनी सांगितले.

अधिक माहितीसाठी : rm@dcpune.ac.in 
संपर्क क्रमांक : (०२०) २६५१ ३३०६
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search