Next
आमदार जयंत पाटील १७ नोव्हेंबरला अकोला दौऱ्यावर
प्रेस रिलीज
Thursday, November 15 | 05:00 PM
15 0 0
Share this story

मुंबई : ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील १७ नोव्हेंबर २०१८ रोजी अकोला जिल्हा दौऱ्यावर असून, या दौऱ्यामध्ये अकोला जिल्हा, ग्रामीण आणि तालुका कार्यकारिणीच्या आढावा बैठका व अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातील बुथ कमिटीचा मेळावा घेणार आहेत,’ अशी माहिती प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी दिली.

अधिक माहिती देताना ते म्हणाले, ‘१७ नोव्हेंबरला सकाळी १०.३० वाजता अकोला येथील कै. डॉ. कुसुमताई वामनराव कोरपे यांच्या स्मृतीशिल्पाचे अनावरण प्रदेशाध्यक्ष पाटील यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर दुपारी अकोला शहर जिल्हा, ग्रामीण व तालुका कार्यकारिणीच्या लागोपाठ आढावा बैठका होणार आहेत. सायंकाळी चार वाजता पत्रकार परिषद झाल्यानंतर मराठा मंडळ स्टेशनरोड येथे अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातील बुथ कमिटीचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. सायंकाळी सहा ते आठ या वेळेत अकोला जिल्ह्यातील विधीतज्ज्ञ, व्यापारी, डॉक्टर्स, व्यावसायिक यांच्याशी प्रदेशाध्यक्ष संवाद साधतील.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link