Next
‘फेसबुक दिंडी’तर्फे ‘नेत्रवारी’ अभियान
BOI
Thursday, June 14, 2018 | 12:15 PM
15 0 0
Share this article:

पुणे/पंढरपूर : जगातील अशा अनेक सुंदर गोष्टी आहेत ज्या अंध बांधव बघू, अनुभवू शकत नाहीत. आपण त्यांच्याकडे केवळ सहानुभूतीच्या नजरेतून न पाहता त्यांच्यासाठी काहीतरी भरीव योगदान देण्याची गरज आहे याच भावनेतून ‘फेसबुक दिंडी’च्या माध्यमातून या वर्षी ‘नेत्रवारी’ हे अभियान राबविण्यात येत असून, त्याद्वारे समाजाला मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प करण्याचे आवाहन केले जात आहे.

आजही लाखो वारकरी आपल्या सावळ्या विठुरायाचे गोजिरे रूप पाहाण्यासाठी पायी पंढरपूरपर्यंत चालत जातात. ज्यांना काही कामामुळे प्रत्यक्ष वारीत सामील होता येत नाही, अशांसाठी ‘फेसबुक दिंडी’च्या माध्यमातून हा सोहळा प्रत्यक्ष पाहिल्याची आणि त्यात सहभागी झाल्याची अनुभूती मिळते; पण आजही आपल्याच समाजातील एक घटक या सुख सोहळा पहाण्यापासून वंचित आहे आणि ते म्हणजे अंध बांधव. त्यांना आपण ही वारी कशी दाखवू शकतो या साध्या कल्पनेतून नेत्रवारीचा जन्म झाला.

पंढरीची वारी हे फक्त एक उदाहरण आहे, पण जगातील अशा अनेक नयनरम्य गोष्टी आहेत हे अंध बांधव बघू शकत नाहीत. त्यांच्यासाठी ‘फेसबुक दिंडी’ने पुढाकार घेतला असून, या वर्षी ‘नेत्रवारी’ हे अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या माध्यामतून मरणोत्तर नेत्रदान करण्याचे आवाहन केले आहे. यासाठी ‘फेसबुक दिंडी’ टीमचे सदस्य स्वप्नील मोरे, मंगेश मोरे, अमित कुलकर्णी, सुरज दिघे, राहुल बुलबुले, अमोल निंबाळकर, ओंकार मरकळे, सुमित चव्हाण, ओंकार महामुनी कार्यरत आहेत.

‘रंगविशेष टीम’ने ‘फेसबुक दिंडी’च्या या उपक्रमाला पाठिंबा देण्यासाठी समाजाला नेत्रदानाचे भावनिक आवाहन करणारा ‘नेत्रवारी’ हा लघुपट तयार केला आहे. या लघुपटाचे लेखन व दिग्दर्शन सुमंत धस यांनी केले आहे.

सन २०१६साली ‘फेसबुक दिंडी’ टीमने राबविलेल्या ‘पाणी वाचवा’ या जलसंधारणाच्या मोहिमेला लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला, तसेच गतवर्षी वारी ‘ती’ची या उपक्रमातही लोक सहभागी झाले. ‘फेसबुक दिंडी’च्या यावर्षीच्या ‘नेत्रवारी’  मोहिमेला देखील लोकांकडून नेहमीप्रमाणे भरभरून प्रतिसाद मिळेल, अशी अशा ‘फेसबुक दिंडी’ने व्यक्त केली आहे.

‘फेसबुक दिंडी’ अॅप डाउनलोड करून नेत्रदानाचा अर्ज भरण्यासाठी येथे क्लिक करा. 
 
‘फेसबुक दिंडी’ इव्हेंटमध्ये सहभागी होण्यासाठी येथे क्लिक करा.
 
‘नेत्रवारी’ लघुपटाची यू-ट्यूब लिंक : https://youtu.be/bNrfgFtGeHY
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search