Next
हिमायतनगरमधील पाच शिवसैनिक अयोध्येला रवाना
नागेश शिंदे
Thursday, November 22, 2018 | 11:56 AM
15 0 0
Share this story



हिमायतनगर :
शहरातील पाच शिवसैनिक २२ नोव्हेंबर २०१८ रोजी सकाळी सात वाजता हिमायतनगर येथून अयोध्येला रवाना झाले आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली अयोध्या मंदिर बांधकामाच्या मागणीसाठी शिवसैनिक अयोध्येत जमणार आहेत. त्यासाठी हिमायतनगर शहरातील शिवसेनेचे प्रमुख नगरसेवक रामभाऊ ठाकरे, उप-तालुकाप्रमुख विलास वानखेडे, राम नरवाडे, रमेश गुडेटवार, सुनील चव्हाण हे पाच जण अयोध्येला रवाना झाले आहेत.
 


परमेश्वर मंदिर कमिटीचे उपाध्यक्ष महावीर श्रीश्रीमाळ, नगराध्यक्ष कुणाल राठोड यांनी त्यांचा गौरव करून, फटाक्यांची आतषबाजी करून, बँड वाजवून या पाच शिवसैनिकांना निरोप दिला. या वेळी बजरंग दल तालुकाप्रमुख गजाननभाऊ चायल, नगरसेवक प्रतिनिधी सावन डाके, शिवसेना शहरप्रमुख प्रकाश रामदिनवार, अनिल भोरे, भावराव वानखेडे, खंडू चव्हाण, युवा सेनेचे उप-जिल्हाप्रमुख योगेश चिल्कावार, बंडूभाऊ अनगुलवार, गजानन पाळजकर, सूरज दासेवार, हनुशिंग ठाकूर, अनिल नाईक, कल्याणसिंग ठाकूर, मंगेश धुमाळे, शिवतेज मित्रमंडळाचे संस्थापक शुभमभाऊ दंडेवाड, नागेश शिंदे, मंगेश शिंदे, आकाश वानखेडे, शंकर जाधव, अक्षय पाटील, आदर्श हेंदे, शरद परोटे यांसह गावातील असंख्य हिंदू बांधव उपस्थित होते. त्यांनी शिवसैनिकांना शुभेच्छा दिल्या.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link