Next
‘ख्रिसमस संध्या’ ठरली आनंदाची पर्वणी
प्रेस रिलीज
Wednesday, December 26, 2018 | 11:54 AM
15 0 0
Share this storyपुणे : दरवर्षी साजरा होणारा ‘ख्रिसमस संध्या’ हा उपक्रम यंदा बालगोपाळांबरोबरच त्यांच्या पालकांसाठीही आनंदाची पर्वणी देणारा ठरला. समानतेचा संदेश देताना तिरंगी फुगे आकाशात सोडून स्वावलंबन, समुपदेशन, रोजगारविषयक प्रशिक्षण यांसह विविध योजना मोफत उपलब्ध करून देण्याचा शुभारंभही या कार्यक्रमादरम्यान करण्यात आला.

माजी महापौर व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रतिनिधी आबा बागुल यांनी दर वर्षीप्रमाणे याही वर्षी सर्वधर्मियांसाठी ‘ख्रिसमस संध्या’चे आयोजन केले होते. शिवदर्शन येथील कै. वसंतराव बागुल उद्यान येथे अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या वर्धापनदिनानिमित्त हा कार्यक्रम हजारो मुला-मुलींच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. या प्रसंगी आरोग्यदायी, स्वावलंबन, समुपदेशन, शिक्षण, प्रशिक्षण, आरोग्य विमा आदी मोफत योजनांचा शुभारंभ माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या पत्नी सत्वशीला चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला.या वेळी माजी आमदार उल्हास पवार, सिनेअभिनेत्री वैशाली जाधव, माजी नगरसेविका सुनंदा गडाळे, उद्योजक कटारिया, शंतनुराव देशपांडे, जितेंद्र जाधव यांच्यासह पुणे नवरात्र महिला महोत्सवाच्या अध्यक्षा जयश्री बागुल, संयोजक अमित बागुल, पुणे नवरात्र महोत्सवाचे पदाधिकारी नंदकुमार बानगुडे, रमेश भंडारी, नंदकुमार कोंढाळकर आदींसह मान्यवर उपस्थित होते.

या प्रसंगी सत्वशीला चव्हाण म्हणाल्या, ‘आपल्या देशात सर्वधर्म समभाव आहे आणि तो सातत्याने गेली १९ वर्षे ‘ख्रिसमस संध्या’ या उपक्रमाद्वारे आबा बागुल जोपासत आहेत, ही कौतुकाची बाब आहे. असे उपक्रम व्यापक स्तरावर होण्याची गरज आहे.’

‘ख्रिसमस संध्ये’दरम्यान विविध मोफत योजनांचा शुभारंभ करताना सत्वशीला चव्हाण, आयोजक व माजी उपमहापौर आबा बागुल, जयश्री बागुल, सिनेअभिनेत्री वैशाली जाधव, अमित बागुल, घनःश्याम सावंत व मान्यवर. (छाया :विक्रांत गायकवाड)

प्रास्ताविकात आयोजक व माजी उपमहापौर आबा बागुल म्हणाले, ‘आज देशात सर्वधर्मसमभाव आहे तो, केवळ काँग्रेस पक्षामुळेच आहे. त्यामुळे गेली १९ वर्षे हा उपक्रम साजरा केला जात आहे. यंदा २० व्या वर्षानिमित्त काँग्रेस पक्षाच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून विविध लोकोपयोगी योजना मोफत उपलब्ध करून देण्याचा शुभारंभ करण्यात आला आहे.’

‘ख्रिसमस संध्या’निमित्त या वेळी उपस्थित बालचमूंना रोज आई-वडिलांची सेवा आणि देशाचे रक्षण करण्याची शक्ती देवदूताकडे करण्यासाठी शपथ देण्यात आली. सूत्र संचालन घनःश्याम सावंत यांनी केले. सांताक्लॉजच्या हस्ते भेटवस्तू स्वीकारत, खाद्य पदार्थांचा आस्वाद या वेळी बालचमूंनी घेतला.


कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सागर बागुल, सागर आरोळे, अभिषेक बागुल, इम्तियाज तांबोळी, बाबासाहेब पोळके, विक्रांत गायकवाड, धनंजय कांबळे, महेश ढवळे, पप्पू देवकर, गणेश खांडरे, गणेश पवार आदींनी विशेष परिश्रम घेतले.

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link