Next
उद्योजक एस. बालन यांना श्रद्धांजली
प्रेस रिलीज
Monday, April 09, 2018 | 06:19 PM
15 0 0
Share this story

उद्योजक एस. बालन
पुणे :  साधी राहणी आणि उच्च विचारसरणी याचे उत्तम उदाहरण असलेल्या एस. बालन यांच्यावर दैवी संस्कार झालेले होते. अत्यंत मृदु स्वभावाचे, विनम्र, आदर्श व्यक्तीमत्व असलेले एस. बालन खऱ्या अर्थाने व्हिजनरी उद्योजक,  शिक्षण महर्षि होते.  त्यांच्या निधनाने अनेकांचा आधारवड हरपला, अशी भावना व्यक्त करत मान्यवरांनी आदरांजली अर्पण केली.

ऑटोमोबाईल, रिअल इस्टेट, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे प्रसिद्ध उद्योजक एस. बालन यांचे २९ मार्च रोजी निधन झाले. उद्योग क्षेत्राबरोबरच सामाजिक कामात आपल्या कार्याचा ठसा उमटविलेल्या एस. बालन यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आली होती. 

या वेळी माजी खासदार रजनी पाटील, उद्योजक प्रकाश धारीवाल,  मराठी बांधकाम व्यावसायिक संघटनेचे घटनेचे अध्यक्ष गजेंद्र पवार, आमदार  अरुण जगताप, नगरसेवक अविनाश साळवे,  प्रजापती ब्रम्हकुमारी परिवाराच्या सुनंदा दीदी,   अभिनेता - दिगदर्शक प्रवीण तरडे, पुणे जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष देवीदास भन्साळी, शिवसेनेचे रघुनाथ कुचिक,  अशोक अष्टेकर,  डॉ. नारायण  ढेकणे,  अजिंक्य घाटे, राजेंद्र चोप्रा, उमेश जोशी, सतीश जोशी,  परिवर्तनचे किशोर ढगे, ‘आयसर’चे डॉ. नातू,  पोलिस अधिकारी विलास भोसले यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. एस.बालन यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांनी आदरांजली अर्पण केली. या वेळी एस. बालन यांचे सुपुत्र पुनीत बालन यांनी कृतज्ञता व्यक्त करत; बालन परिवाराच्या वतीने उपस्थित सर्वांचे आभार मानले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link