Next
वारकऱ्यांसाठी कायमस्वरूपी शेड्सची उभारणी
फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फाउंडेशनचा पुढाकार
प्रेस रिलीज
Wednesday, June 26, 2019 | 04:32 PM
15 0 0
Share this article:


पुणे : ज्ञानोबा-तुकोबाच्या गजरात पालख्या पंढरपूरच्या दिशेने निघाल्या असून, लाखो वारकऱ्यांचा मेळा आळंदी आणि देहूतून पंढरीच्या वाटेवर चालत आहे. या वारकऱ्यांना वारीदरम्यान उन्हा-पावसात निवारा मिळावा म्हणून फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि मुकुल माधव फाउंडेशनतर्फे वारी मार्गावर तीन कायमस्वरूपी शेड्स उभारण्यात आल्या असून, शिवाय इतर सामाजिक उपक्रमांचे लोकार्पणही मुकुल माधव फाउंडेशनतर्फे करण्यात आले.


पिराची कुरोळी, लोणी काळभोर आणि वाखरी (पंढरपूर) येथे वारकऱ्यांच्या निवाऱ्यासाठी उभारण्यात आलेल्या या शेड्सचे उद्घाटन निवासी जिल्हाधिकारी अजित देशमुख यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. या वेळी प्रांताधिकारी सचिन ढोले, गटविकास अधिकारी श्री. घोडके, तहसीलदार, ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, यांच्यासह फिनोलेक्सचे उपाध्यक्ष बी. आर. मेहता, नितीन कुलकर्णी व मुकुल माधव फाउंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते. लोणी काळभोर येथील शेडचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे उपमुख्याधिकारी संदीप कोहिनकार यांच्या हस्ते झाले. या शेड्समुळे वारकऱ्यांना रात्रीच्या वेळी झोपण्याची सोय होणार आहे. वारीनंतर या शेड्सचा उपयोग गावकऱ्यांना वर्षभर त्यांच्या कार्यक्रमासाठी करता येणार आहे. संबंधित ग्रामपंचायतीकडून त्याची देखभाल केली जाणार आहे.


या सोबतच ‘मुकुल माधव’ने सोलापूर येथील माधव वेल्फेअर फाउंडेशनच्या सहकार्याने २०१८मध्ये जलसंधारण प्रकल्प सुरू केला होता. त्या प्रकल्पाचा लाभ माढा तालुक्यातील ३२ गावांना होणार आहे. सोलापूरमधील जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेणाऱ्या नववी आणि दहावीतील १०० विद्यार्थिनींना सायकलींचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे पालकांकडून आपल्या मुलींना शाळेत जाण्यासाठी प्रोत्साहन मिळत आहे. पुण्यातल्या वडगाव आनंद येथील विद्यार्थ्यांना जेवण्यासाठी स्वच्छ आणि सुरक्षित वातावरण मिळण्यासाठी पक्के शेड उभारले आहे. रुग्णांसाठी केईएम रुग्णालयात मासिक मधुमेह तपासणी शिबिराचे आयोजन केले. त्यात २६ रुग्णांवर उपचार करण्यात आले. 


पुण्यापासून २०० किमी अंतरावर असलेल्या ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील वडाची वाडी गावात आजीबाईंची अनोखी शाळा भरली. ५० ज्येष्ठ नागरिक महिलांना साक्षर करण्यासाठी ‘मुकुल माधव’ने हा पुढाकार घेतला असून, त्यात त्यांना अक्षर ओळख व मूलभूत शिक्षण दिले जाणार आहे. सगळ्या आजींना गणवेश दिल्यामुळे ही आजीबाईंची शाळा सर्वांचे लक्ष वेधत आहे. यांसह खंडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात गर्भधारणेच्या काळात आपत्कालीन परिस्थिती कशी हाताळावी, याचे १२२ आशा व एएनएम नर्सेसना प्रशिक्षण देण्यात आले, असे मुकुल माधव फाउंडेशनच्या व्यवस्थापकीय विश्वस्त रितू प्रकाश छाब्रिया यांनी सांगितले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search