Next
सह्याद्री हॉस्पिटलतर्फे प्रगत कॅन्सर केअर सेंटर सुरू
BOI
Thursday, May 02, 2019 | 03:09 PM
15 0 0
Share this article:

सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या कॅन्सर केअर सेंटरची घोषणा करताना डॉ. चारुदत्त आपटे, डॉ. शोना नाग, डॉ. संजय एम. एच, डॉ. राहुल कुलकर्णी, डॉ. विनोद गोरे, डॉ. तुषार पाटील व डॉ. सुनिल राव.

पुणे  : ‘सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीने हडपसर येथे प्रगत कॅन्सर केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. या सेंटरमुळे कर्करोगाशी संबंधित सर्व अद्ययावत वैद्यकीय सेवा एकाच छताखाली उपलब्ध होतील,’ अशी माहिती सह्याद्री हॉस्पिटल्सचे अध्यक्ष व न्युरोसर्जन डॉ. चारूदत्त आपटे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी आँकोलॉजी विभागाच्या संचालिका डॉ. शोना नाग, रेडिएशन आँकोलॉजिस्ट व कर्करोग तज्ञ डॉ. संजय एम. एच. व सह्याद्री हॉस्पिटल्सचे मुख्य कामकाज अधिकारी डॉ. सुनिल राव उपस्थित होते.

या वेळी बोलताना डॉ. चारुदत्त आपटे म्हणाले, ‘पुण्यात व्यापक सेवा देणाऱ्या कॅन्सर केअर सेंटरची गरज लक्षात घेऊन आम्ही या सेंटरचे नियोजन केले आहे. हा नवीन उपक्रम आणि अद्ययावत आँकोलॉजी व रेडिएशन विभागाच्या मदतीने पुण्याच्या आसपासच्या ग्रामीण भागातून येणाऱ्या गरजू रूग्णांना गुणवत्तापूर्ण कर्करोग उपचार प्रदान करणे हे सह्याद्रीचे मुख्य ध्येय आहे. सुरूवातीपासूनच सर्वोत्तम सेवा व तज्ज्ञता यासाठी सह्याद्री हॉस्पिटलने नावलौकिक कमावला आहे. हे नवीन कॅन्सर केअर सेंटर शहरातील प्रख्यात कर्करोगतज्ञ डॉ. शोना नाग आणि त्यांच्या तज्ज्ञ टीमच्या नेतृत्वाखाली कार्यरत असेल.’

या वेळी बोलताना सह्याद्री हॉस्पिटलमधील आँकोलॉजी विभागाच्या संचालिका डॉ. शोना नाग म्हणाल्या, ‘आँकोलॉजीचे तीन मुख्य आधारस्तंभ सर्जिकल आँकोलॉजी, मेडिसिन आँकोलॉजी व रेडिएशन आँकोलॉजी एकाच छताखाली उपलब्ध असणे हे या अद्ययावत कॅन्सर केअर सेंटरचे वैशिष्ट्य आहे. याबरोबरच शारीरिक आणि मानसिक पुनर्वसन यासह पेशंट सपोर्ट ग्रुप आणि होमबेस्ड पॅलिएटिव्ह केअर यांसारख्या सहाय्यक सेवा पुरविण्यावर लक्ष देण्यात आले आहे. येथे ट्युमर बोर्डसारखे अद्वितीय व्यासपीठ उपलब्ध करण्यात आले असून, ज्याद्वारे डॉक्टर आपल्या पेशंट केस संदर्भात आमच्या तज्ज्ञांशी संवाद साधू शकतील. त्याचबरोबर पेशंट सेकंड ओपिनियनदेखील घेऊ शकतील. या तज्ञ टीममध्ये वैद्यकीय तज्ज्ञ, शल्यविशारद, रेडिएशन आँकोलॉजिस्ट व इतर तज्ज्ञांचा समावेश असेल.’

त्या पुढे म्हणाल्या, ‘या केअर सेंटरच्या अंतर्गत आम्ही लवकरच ब्रेस्ट कॅन्सरचे विशेष युनिट सुरू करणार असून, याद्वारे स्तनाच्या कर्करोगासह सर्व समस्यांवर उपचार केले जातील. तसेच येथे स्टोमा क्लिनिक, तोंडाचा कॅन्सर झालेल्या रूग्णांचे पुनर्वसन करण्यासाठी स्पिच थेरपी क्लिनिक व निसर्गोपचार, होमिओपॅथी, आयुर्वेद, अॅक्यूप्रेशर आणि इतर महत्वाच्या सहाय्यक उपचार पद्धतींच्या इंटीग्रेटेड थेरपी युनिटचा समावेश असणार आहे.’

रेडिएशन आँकोलॉजिस्ट व कर्करोग तज्ज्ञ डॉ. संजय एम. एच. म्हणाले, ‘सर्व प्रकारच्या ट्युमर्सच्या उपचारासाठी प्रगत रेडिएशन उपकरणे, अद्ययावत ऑपरेशन थिएटर्स, 12 खाटांची डे केअर सुविधा, कर्करोगाचे निदान करण्यासाठी पेट सिटी, एमआरआय, मॅमोग्राफी, लॅबोरेटरी सुविधा उपलब्ध असतील. रूग्णांना येथे जागतिक दर्जाच्या व्यापक सेवांचा लाभ मिळेल. याशिवाय अॅक्टीव्ह ब्रेथ को-ओर्डिनेटर (एबीसी), रोबोटिक काऊच यांसारखी अद्ययावत उपकरणे येथे आहेत.’

या कॅन्सर सेंटरमधील तज्ज्ञांच्या टीममध्ये सह्याद्री हॉस्पिटलमधील आँकोलॉजी विभागाच्या संचालिका डॉ. शोना नाग, रेडिएशन आँकोलॉजिस्ट व कर्करोग तज्ञ डॉ. संजय एम. एच., मेडिकल आँकोलॉजिस्ट डॉ. तुषार पाटील व डॉ. राहुल कुलकणी, सर्जिकल आँकोलॉजिस्ट डॉ. विनोद गोरे व डॉ. जॉय घोष, सहाय्यक सल्लागार डॉ. अल्मास पठाण, सिनियर रजिस्ट्रार (रेडिएशन आँकोलॉजी) डॉ. सुर्यप्रकाश वाकीना आणि मेडिकल फिजिसिस्ट कांताराम दरेकर यांचा समावेश आहे.

मोफत कर्करोग शिबिर पाच मे ते ३१ मे
लोकांमध्ये कर्करोगाविषयी जनजागृती व्हावी, या हेतूने पाच ते ३१ मे २०१९ दरम्यान सह्याद्री हॉस्पिटलच्या हडपसर, नगररोड व डेक्कन शाखांमध्ये मोफत कर्करोग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत रूग्णांना कर्करोग तज्ज्ञांकडून मोफत सल्ला, सवलतीच्या दरात विविध चाचण्यांचा लाभ घेता येणार आहे. या शिबिरात सहभागी होण्याकरिता ८८८८८ २२२२२ या क्रमांकावर संपर्क साधावा,असे आवाहन हॉस्पिटलद्वारे करण्यात आले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search